संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

विवाहितेचा इच्छेविरुद्ध गर्भपात, सासरच्यांसह डॉक्टरांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई (जि. बीड) - विवाहितेच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याच्या आरोपावरून सासरच्या मंडळींसह डॉक्‍टर पती-पत्नीविरुद्ध येथील शहर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. आठ) रात्री गुन्हा नोंद झाला आहे. न्यायालयाच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

अंबाजोगाई येथील विवाहितेचा टाकळी (ता. देवणी) येथील शरद सुभाष पाटील याच्याशी विवाह झाला. विवाहानंतर अश्‍विनीला सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक त्रास होत असे. यातच ती गर्भवती राहिली असता पती शरद पाटील, सासरा सुभाष पाटील, सासू शकुंतला पाटील यांच्यासह नणंदा यांनी संगनमत केले.

अश्‍विनीला 13 एप्रिल 2016 रोजी अंबाजोगाई येथील डॉ. प्रसाद गुरव व डॉ. रेखा गुरव यांच्या योगेश्‍वरी मॅटर्निटी होम या रुग्णालयात नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केला म्हणून सासरच्या मंडळींसह डॉक्‍टर पती-पत्नीविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार गोपाळ सूर्यवंशी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 1st Test: शुभमन गिलने टॉस जिंकला! सिराज-जडेजाला मात्र बाहेर बसवलं, कोणाला मिळाली Playing XI मध्ये संधी?

अमेरिकेने इराणविरुद्धच्या युद्धात एक्स्पायर झालेली क्षेपणास्त्रे वापरली; सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीसमोर सुनावणी

Truck Bike Accident : तेरवीहून परतताना पती-पत्नी ठार; शिंदोला मार्गावर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात

Chadrapur Crime : चंद्रपूर हादरले! चौकात कवटी, रेल्वे पटरीलगत मृतदेह; दोन्ही अवयव एकाच व्यक्तीचे असल्याचा संशय

Dengue-Like Infection : मुंढेत ४० जणांना डेंगीसदृश्य लागण; गावात खळबळ

SCROLL FOR NEXT