4Bibtya_0_0 
मराठवाडा

बिबट्याच्या मागावर दोन पथके, जामखेड परिसरात अजूनही दहशत

सकाळ वृत्तसेवा

जालना : काही दिवसांपूर्वी जामखेड भागात हिंस्रप्राण्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला होता. हा हल्ला बिबट्याने केल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. तसेच या बिबट्याच्या शोधाकामी जालना-औरंगाबाद वनविभागाचे पथक शोधकार्य करत आहे. मागील काही दिवसांपासून अंबड व बदनापूर तालुक्यातील वन्यप्राण्यांकडून हल्ले झाल्याच्या घटनासमोर आल्या आहेत. मात्र, वनविभागाकडून या हल्ल्यामागे कोणता हिंस्रप्राणी आहे, हे स्पष्ट केलेले नाही.

दरम्यान अंबड तालुक्यातील जामखेड येथे तर हिंस्रप्राण्याच्या हल्ल्यात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. महिलेवरील हा हल्ला बिबट्याने केला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. या बिबट्याच्या शोधासाठी वनविभागाने दोन पथके स्थापन केले असून, एक पथक दिवसा, तर एक पथक रात्री शोधकार्य करीत आहे. दरम्यान, या बिबट्याच्या शोधासाठी जालना व औरंगाबाद या दोन्ही जिल्ह्यांतील वनविभागाचे पथक दोनही जिल्ह्यांत शोधकार्य करीत आहेत, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

शोधानंतर लावणार पिंजरे
सध्या वनविभागाकडून बिबट्याचा मार्ग शोधण्याचे काम सुरू आहे. बिबट्याचा मार्गाचा सुगावा लागल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले जाणार आहेत, असेही वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.


अंबड तालुक्यातील बोरगाव येथील हरणावरील हल्ला हा कुत्र्यांनी केल्याचा संशय आहे. जामखेड येथील महिलेवर झालेला हल्ला हा बिबट्याने केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या बिबट्याच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आले असून जालना व औरंगाबाद या दोन ही जिल्ह्याचे पथक शोधकार्य करीत आहेत.
- अभय अटकळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, जालना.
 

संपादन - गणेश पिटेकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway : कोकणवासीयांची चिंता वाढली! मे महिना उजाडला तरी परशुराम घाटातील काम अपूर्णच; यंदाही एकेरी वाहतुकीचा जाच?

बंगालमध्ये २० जागांवरून सुरू झालेला वाद निकालात कोणाच्या पथ्यावर? पाहा TMC आणि भाजपची स्थिती

Tamil Nadu Assembly Election: चेन्नईत मोठी राजकीय उलथापालथ, विजय यांच्या चालकाच्या मुलाचा राजकीय विजय; भावूक झाल्याचा व्हिडिओ ‘व्हायरल'..

Latest Marathi News Live Update : नसरापूर अत्याचारप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट

Pune Crime : नसरापूरमध्ये क्रौर्याची परिसीमा! तोंडात पायमोजा कोंबून अत्याचार, चिमुकलीच्या छातीवर जखमांच्या खुणा; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT