Ismail Shaikh News esakal
मराठवाडा

Parbhani | माजी नगरसेवक पोलिसांच्या जाळ्यात, जिंतूर पोलिसांची कारवाई

जिंतूर पोलिसांची कारवाई

राजाभाऊ नगरकार

जिंतूर (जि.परभणी) : काही महिन्यांपासून हद्दपार असलेला गुंड प्रवृत्तीचा माजी नगरसेवक शेख इस्माईल हा हद्दपारीच्या कालावधीत बेकायदीशीररित्या जिंतूरात वास्तव्य करीत असल्याने जिंतूर (Jintur) पोलिसांनी शनिवारी (ता.चार) रात्री अकरा वाजता कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान त्यास राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी नगरसेवक शेख इस्माईल शेख सलीम व इतर तीन आरोपींना अनेक गुन्हेगारी घटनांमुळे नऊ महिन्यांकरिता जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हद्दपारीचे आदेश पारित केले होते. (Former Corporator Arrested By Police In Jintur Of Parbhani)

परंतु हद्दपारीच्या कालावधी सुरू असतानाच शेख इस्माईल हा जिंतूरात बेकायदेशीर रित्या वास्तव्य करीत असल्याची माहिती गुप्त सूत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिस प्रशासनाच्या मोठ्या पथकाने धडक कारवाई करत हद्दपार आरोपी शेख इस्माईल यास ताब्यात घेतला. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करुन आरोपीस पोलिसांमार्फत पुन्हा परभणी जिल्ह्याबाहेर औरंगाबाद (Aurangabad) एमआयडीसी पोलीस हद्दीत सोडण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.

सदरील कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी पांडुरंग गोफणे, पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवाड, सहायक पोलीस निरीक्षक विलास कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक कोरके आणि सर्वश्री वाघमारे, भुसारे, शहाणे, निळेकर, महिला पोलीस लीला जोगदंड आदी पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal : अंगावर धावणे महागात पडले, ICCची यशस्वी जैस्वालवर कारवाई! ५ सामन्यांची बंदी की आणखी काही? नेमका काय निर्णय घेतला...

ती गोष्ट घडली आणि लता मंगेशकर यांनी रागात थेट CID च्या निर्मात्यांनाच केलेला फोन केला, इन्स्पेक्टर दयाने सांगितला किस्सा

Nigdi Chakan Metro : भोसरीतील उड्डाणपूल पाडण्यावरून राजकीय मौन; निगडी-चाकण मेट्रो ‘डीपीआर’ला मंजुरीची प्रतीक्षा

Marathi News Live Updates : सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला

Bank Strike: सलग 5 दिवस बँका बंद? सप्टेंबरमध्ये पुन्हा संप; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT