sambhaji patil nilangekar 
मराठवाडा

माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह

राम काळगे

निलंगा (लातूर): माजीमंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे कोरोना पॉझिटिव्ह झाले असून, त्यांची प्रकृती एकदम चांगली असून, सध्या ते घरीच राहून उपचार घेत आहेत. संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याबरोबरच आपली व कुटूंबाची काळजी घेण्याचे अवाहन त्यांनी सोशल मिडीयाद्वारे केले आहे.

सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, दैनंदिन तपासणीची आकडेवारीही वाढतच जात आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरणा संसर्ग वाढत असल्यामुळे नागरिकांत चिंता निर्माण झाली आहे. संभाजीराव पाटील निलंगेकर हे महाराष्ट्रभर पक्षाच्या कामासाठी सतत फिरत असतात.

सध्या बसवकल्याण विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक सुरू आहे. हा मतदार संघ निलंगा तालुक्याला लागून आहे. शिवाय आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे चार दिवसांपूर्वी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कर्नाटक येथे सभेला संबोधित करण्यासाठी गेले होते. दरम्यान, शंका आल्याने त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. यात ते पॉझिटिव्ह आले आहेत. या बाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियाद्वारे कळवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha polls: राज्यसभेत ‘क्रॉस वोटिंग’ची चर्चा; फक्त काही आमदार बदलू शकतात सगळं चित्र; कोणते आमदार बदलणार खेळ?

Kolhapur Amba Ghat Closed : कोल्हापुरातून कोकणात जाणारा आणखी एक मार्ग राहणार बंद, आंबा घाटात गॅस टँकर पलटला

Maharashtra Politics: अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; चार महिन्यांनंतरही निर्णय रखडला, खाते परत मिळवण्यासाठी पक्ष आक्रमक

Indian Railways Hydrogen Train: देशातील पहिला प्रयोग हरियानात! डिझेलविना, प्रदूषणविरहित धावणार हायड्रोजन रेल्वे; रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

SCROLL FOR NEXT