file photo 
मराठवाडा

अन् नदीपात्रातला हा थरार...

अच्यूत जोगदंड

पूर्णा (जि.परभणी) : चोरट्या मार्गाने गोदावरी पात्रातील वाळू उपश्यासाठी वापरण्यात येणारे चार लोखंडी टोकरे महसूल व पोलिसांच्या पथकाने जप्त केले होते. सदरील जप्त केलेले टोकरे पळवून नेण्याच्या प्रयत्न चुडावा पोलिसांनी शुक्रवारी (ता.१७) हाणून पाडला. जीव धोक्यात घालून या कार्यवाहीत सहा लाख रुपयांचे चार टोकरे जप्त केली. या वेळी चारही आरोपी पाण्यात उडी मारुन फरार झाले. या प्रकरणी चुडावा पोलिस ठाण्यात चार आरोपी विरूध्द शनिवार (ता.१८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढु नये म्हणून पोलिस, तहसिल, कृषी, नगरपालिका, सरपंच, पोलिस पाटील सर्व प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र परीश्रम घेत आहेत. मात्र, काही जण आपल्या भविष्याच्या उपजीविकेसाठी चोरट्या मार्गाने गोदावरी पात्रातील वाळू उपसासाठी वापरात येणारे जप्त केलेले चार टोकरे पळवून नेण्याच्या प्रयत्न करत आहेत.


धानोरा मोत्या (ता.पूर्णा, जि.परभणी) शिवारातील नदी पात्रात पोलिस व महसूलच्या पथकाने जप्त केलेले चार लोखंडी टोकरे नदी पात्रा जवळ आणून लावले होते. दरम्यान, शुक्रवारी दुपारी कर्मचाऱ्यांच्या ताब्यातील टोकरे पळून नेण्याचा चार आरोपींनी प्रयत्न केला. या वेळी चुडावा पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरिक्षक शिवाजी देवकते यांनी स्वतः नदी पात्रात जाऊन आरोपींचा पाठलाग करून ते टोकरे ताब्यात घेतले. 

आरोपींचे आधारकार्ड पोलिसांच्या हाती
या घटनेत असणारे आरोपी हे नदीत उड्या टाकून फरार झाले असले तरी, त्या पैकी एका आरोपीचा मोबाईल व आधारकार्ड पोलिसांच्या हाती लागले आहे. महसूल कर्मचारी आर. आर. सरोदे, अभिजित पाटील, तलाठी मावरे यासह चुडावा पोलिस जमादार रमाकांत तोटेवार, दीपक मुदिराज, सुधीर काळे, मोहन महामुने, अशोक कांबळे यांनी महत्वाची भूमिकां बजावली. 

हेही वाचा - एक हजार ३१ वाहनांवर पोलिसांची कारवाई ​

टोकरे महसुलच्या ताब्यात
ताब्यात घेतलेल्या चारही लोखंडी टोकरे जप्त केली असून त्यांची बाजारभाव अंदाजे किंमत सहा लाख रुपये एवढी आहे. या प्रकरणी चुडावा पोलिस ठाण्यात चार आरोपी विरूध्द शनिवार (ता.१८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपी पाण्यात उडी मारून फरार झाले आहेत. सदरील टोकरे महसुल कर्मचाऱ्याच्या ताब्यात दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT