Farmer-Suicide 
मराठवाडा

मराठवाड्यात चार शेतकरी आत्महत्या 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नापिकी आणि कर्जाला कंटाळून चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी (ता. १३) समोर आल्या. यामध्ये जालना, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

सेलू शहरातील वीटभट्टीलगतच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन वालूर येथील शेतकरी मोमीन रशीद मोमीन नूर (वय ६७) यांनी मंगळवारी दुपारी आत्महत्या केली. नापिकी, कर्ज आणि घरखर्चाच्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. महम्मद गौस महम्मद नूर यांच्या माहितीवरून सेलू ठाण्यात घटनेची नोंद झाली.

त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. दुसऱ्या घटनेत नागासिनगी (ता. सेनगाव) येथे आत्माराम सीताराम गिते (वय ६५) यांनी मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची पाच एकर शेती असून दोन वर्षांपासूनच्या नापिकीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेतून ते अस्वस्थ होते. शेतातील झाडाला ते गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले.

तिसरी घटना जालना जिल्ह्यातील आहे. मठपिंपळगाव (ता. अंबड) येथील अल्पभूधारक शेतकरी बबन जनार्दन जिगे (वय ४२) यांनी ३१ ऑक्‍टोबरला शेतात विष प्राशन केले होते. त्यानंतर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात ते उपचार घेत होते. सोमवारी (ता.१२) उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर बॅंकेचे अडीच लाखांचे कर्ज होते. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी आहे. 

वाळून गेलेल्या उसात घेतला गळफास 
तांदुळजा - सारसा (ता. लातूर) येथे भुजंग माणिकराव पवार (वय ५५) यांनी मंगळवारी (ता. १३) सकाळी वाळून गेलेल्या उसाच्या फडात गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्ज काढून त्यांनी तीन एकर ऊस जोपासला. उसाच्या उत्पन्नावर त्यांनी मुलीच्या लग्नाचे नियोजन केले होते; मात्र पावसाअभावी ऊस वाळल्याने कर्जफेड, मुलीचे लग्न, घरखर्च कसा भागवायचा, या विवंचनेत ते होते. मुरूड पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: नगरपरिषद निवडणुकांत भाजप नंबर वन! देवेंद्र फडणवीसांनी विजयाचं श्रेय कुणाला दिलं? म्हणाले...

हृदयद्रावक घटना! 'टिप्परच्या धडकेत पिता-पुत्राचा जागीच मृत्यू'; आजारी मुलाला शाळेतून आणताना गुरसाळेत काळाचा घाला..

Success Story:'शेतकऱ्याची मुलगी बनली न्यायाधीश'; ऐश्वर्या यादव यांनी मिळवली १२ वी रँक; रात्रदिवस अभ्यास करुन यशाला घातली गवसणी..

Daily Walking Benefits: रोज चालणे शरीरासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

U19 Asia Cup Final: भारतीय फलंदाजांची पाकिस्तानच्या माऱ्यासमोर शरणागती; पराभवासह विजेतेपदाचं स्वप्नही भंगलं

SCROLL FOR NEXT