manwi sangade 
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यात आढळले चार मानवी सांगाडे

जगन्नाथ पुरी

सेनगाव(जि. हिंगोली) : तालुक्यातील तळणी गावालगत गावठाण जागेत सेंद्रिय खतासाठी खड्डा खोदत असताना ग्रामस्थांना चार मानवी सांगाडे गुरुवारी (ता. २८) सापडले. त्यानंतर हे सर्व सांगाडे जमा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. मात्र, हे सांगाडे कधीचे आहेत, कुणाचे आहेत, याची माहिती ग्रामस्थ घेत आहेत.

तालुक्यातील तळणी येथे गुरुवारी (ता. २८) धम्मरत्न गवळी, सुमेध खंदारे, गंगाधर वानखेडे, बाळू खंदारे हे गावठाण जागेत सेंद्रिय खत तयार करण्यासाठी खड्डा खोदत होते. सुमारे तीन फूट खोल गेल्यानंतर त्यांना मानवी शरीराचा सांगाडा आढळून आला. 

आणखी दोन सांगाडे आढळून आले

झोपलेल्या स्थितीत असलेल्या या सांगाड्याचे हात, पाय, कवटी, छातीच्या फासोळ्या अशी सर्व हाडे चांगल्या स्थितीत आढळून आले. उत्सुकता म्हणून त्यानंतर त्यांनी आजूबाजूला खोदकाम सुरू केले असता त्या ठिकाणी सुद्धा त्यांना दुसरा सांगाडा आढळून आला. ग्रामस्थांनी आणखी आजूबाजूला खोदकाम केले असता त्या ठिकाणीही आणखी दोन सांगाडे आढळून आले. 

सांगाडे कुटुंबातील असण्याची शक्यता

या इतर सांगाड्यांच्या डोक्याची कवटी ते पायाच्या हाडांपर्यंत सर्व हाडे आजही सुरक्षित आहेत. तळणी गावातील बहुतांश तरुण हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतात. त्यामुळे त्यांनी हे सांगाडे पाहिल्यानंतर भीती न बाळगता सर्व सांगाडे जमा केले. येथे आढळून आलेले मृतदेहांचे सांगाडे एकाच कुटुंबातील असण्याची शक्यता गावकरी वर्तवत आहेत. 

४० ते ५० वर्षांपूर्वीचे मृतदेह

सर्व सांगाडे एका ठिकाणी आणि एका रांगेमध्ये पुरण्यात आले आहेत. पूर्वीच्या काळी देवी, प्लेगसारखे साथरोगाचे आजार असायचे. त्या वेळी एकाच घरातील अनेक व्यक्ती मृत्युमुखी पडत. रोगाची अन्यत्र लागण होऊ नये, दुसऱ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी मृतदेह जमिनीत खोल खड्डा खोदून पुरून टाकण्यात येत होते. त्यामुळे हे सांगाडे ४० ते ५० वर्षांपूर्वी साथरोगात मृत्यू झालेल्या व्यक्तींची असण्याची शक्यता गावकरी व्यक्त करीत आहेत.

अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न

शिवाय पावसाळा ऋतू असला की ग्रामीण भागात मृतदेहांना जाळण्यासाठीही खूप अडचणी येत होत्या. त्यामुळे मृतदेह पुरून टाकण्याशिवाय पर्याय राहात नव्हता. हे सर्व मृतदेह गावातील एकाच कुटुंबातील असण्याची शक्यता असून आज घडीला हे मृतदेह नेमके कोणाच्या घरचे आहेत, याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न गावकरी करीत आहेत.

सांगाडे जमा करून ठेवले

गावातील काही तरुण अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतात. त्यामुळे या तरुणांना भूत, दैवी शक्तीची अजिबात भीती वाटत नाही. दैवी शक्ती किंवा भूतावर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे हे सर्व सांगाडे जमा करून ठेवले आहेत.
-सुमेध खंदारे (तळणी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Gokul Election : सतेज पाटलांनी ताकद दाखवली, एकट्याने १८५१ ठराव केले दाखल; 'लवकरच बिन आवाजाचा बॉम्ब फुटणार'

ICC चं वेळापत्रक ठरलं वादाचं कारण! एका प्रश्नानंतर माजी क्रिकेटपटूंना जीवे मारण्याच्या धमक्या; महिला टी-20 विश्वचषकात मोठा वाद

Latest Marathi News Live Update : राज्यात 5 दिवस अतिमुसळधार पाऊस; कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट

Viral Rescue video: भर पावसात रात्र काढली जंगलात; अतिउत्साह नडला; गोव्यातील सहा युवकांची अखेर सुटका, व्हिडिओ व्हायरल..

लग्नाला १४ वर्ष झाली, पण पाळणा हलला नाही; पत्नीला राग अनावर, संतापात पतीच्या गुप्तांगावर उकळतं पाणी ओतलं अन्...

SCROLL FOR NEXT