Four new positive cases in Osmanabad 
मराठवाडा

coronavirus : उस्मानाबादेच चार नवे रुग्ण, गर्भवती महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : जिल्ह्यात मंगळवारी (ता. १६) एका गर्भवती महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर चार नवीन कोरोना रुग्णांची यामध्ये भर पडली आहे. त्यामुळे बधितांच्या आकडा १५३ वर पोहोचला आहे. 
गर्भवती महिलेला काही दिवसांपूर्वी तिला लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचा आज मंगळवारी (ता. २६) मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद शहरातील बोंबल्या हनुमान चौक  भागात राहणारी ही महिला आहे. गेल्या पाच दिवसात कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या चार झाली आहे. 

मंगळवारी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 53 स्वब तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैदकीय महाविद्यालय, लातूर तेथे पाठविण्यात आले होते. सर्व अहवाल  प्राप्त झाले असून त्यापैकी 4 पॉसिटीव्ह, 4 अनिर्णित व 45 नेगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्हीमध्ये एक पेशंट वाणेवाडी (ता. उस्मानाबाद) येथील असून पूर्वीच्या पेशंटच्या संपर्कातील आहे. एक पेशंट सलगरा (ता. तुळजापूर) येथील आहे. एक पेशंट  मसाला (ता. तुळजापूर) येथील असून तो दोन दिवसापूर्वी पॉसिटीव्ह पेशंट चा सहप्रवासी आहे. एक पेशंट बेटजवळगा (ता. उमरगा) येथील असून तो दहा दिवसापूर्वी मुंबई वरून आला आहे. 

जिल्ह्यामध्ये आतापर्यंत २२०२ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील १४५ जणांचे अहवाल पॉझीटिव्ह आले होते. त्यातून १०४ जण बरे होउन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत उस्मानाबाद शहरात सर्वाधिक ५६ रुग्ण आढळले असून, आज कोरोनाने शहरात तीसरा बळी गेल्याने चिंता वाढली आहे.

लातूरमध्ये उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधित गर्भवती मातेच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. पण त्या महिलेचा मृत्यू झाल्याने आता धोका वाढला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चाकणकर राज्यातल्या सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, रुपाली ठोंबरेंचा आरोप; मुख्यमंत्री फडणवीसांचे केले अभिनंदन

Latest Marathi News Live Update : 'फरसा वाले बाबा' यांच्या मृत्यूनंतर, जखमी ट्रक चालकचाही मृत्यू

Maharashtra Transport News: इलेक्ट्रिक बस ठरताहेत तोट्याचा सौदा; एसटीची सरकारकडे मदतीची याचना

Kanthha Tamil Movie Review : सिनेमा दिग्दर्शकाचा असतो की सुपरस्टारचा?

Latur News: ‘नाटक-चित्रपट क्षेत्र मृगजळ’; मोहन जोशींचा नव्या पिढीला इशारा

SCROLL FOR NEXT