जप्त केलेल्या विदेशी बनावटीच्या चार पिस्तूल आणि सहा जिवंत काडतूसासह पोलिस अधीक्षक चैतन्य एस. अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे व इतर.  
मराठवाडा

जालन्यात चार पिस्तूलांसह सहा जिवंत काडतूस जप्त 

उमेश वाघमारे

जालना -  लाॅकडाउनच्या काळात जालना शहरात पिस्तूल विक्रीचा गोरख धंदा सुरू असल्याचे पुढे आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर व चंदनझिरा पोलिसांनी बुधवारी (ता.२२) विदेशी बनावटीच्या चार पिस्तूलांसह सहा जिवंत काडतूस जप्त केले आहेत. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, लाॅकडाउनच्या काळात जिल्ह्यांच्या सीमाबंद असताना जिल्ह्यात पिस्तुलांचा प्रवास झाला कसा ? या पिस्तुल आणल्या कोठून आणि त्या खरेदीचे उद्देश काय होता ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. 

जालना शहरातील ढवळेश्वर येथील एक व्यक्ती पिस्तूल विक्री करत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या पथकास यासंदर्भात माहिती देत छापा टाकण्याचे आदेश दिले.

चंदनझिरा पोलिसांनी ढवळेश्वर येथे छापा टाकून पिस्तूल विक्री करणारा संशयित परमेश्वर अंभोरे (वय ३४ रा. ढवळेश्वर, जालना) याला शिताफिने ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असताना त्याने तीन जणांनी चार पिस्तूल विक्री केल्याची कबुली दिली. त्यानंतर चंदनझिरा पोलिसांनी गणेश ज्ञानेश्वर काकडे (रा. ढवळेश्वर) याच्याकडून दोन, कृष्णा सलामपुरे (रा. ढवळेश्वर, जालना) याच्याकडून एक तर रामदास उत्तम मिसाळ (रा. जानेफळ, ता. भोकरदन) याच्याकडून एक पिस्तूल जप्त केली आहे. पोलिसांनी एकूण एक लाख ६० हजार रुपयांचे विदेशी बनावटीचे चार पिस्तूल व सहा जिवंत काडतूस जप्त केले आहेत. तसेच एक चार चाकी वाहन ही जप्त करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी पिस्तूल विक्रेता परमेश्वर, दोन पिस्तूल खरेदी करणारा गणेश काकडे, कृष्णा सलामपुरे , रामदास मिसाळ या चौघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधीकारी सुधीर खिरडकर, चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलिस कर्मचारी नंदलाल ठाकुर, देवाषिश वर्मा,अनिल काळे यांनी केली. 

मागील दोन वर्षांमध्ये पिस्तूल जप्तीची ही सर्वात मोठी कारवाई करण्यात यश आले आहे. या कारवाईत चार पिस्तूल, सहा जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. 
-चैतन्य एस., पोलिस अधीक्षक, जालना. 

(संपादन : संजय कुलकर्णी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

Bidkin Bribe Case : बिडकीन ग्रामीण रुग्णालयात लाच प्रकरण उघड; वैद्यकीय अधीक्षकासह दोघे जाळ्यात, परिसरात खळबळ

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Loha News : संतोष म्हणतो आणि फिरून जन्मेन मी..! भारसावडेकरांनी घेतला पुढाकार

KKR vs PBKS Live: इडन गार्डनवर मुसळधार पाऊस... ५-५ षटकांची होणार मॅच, जाणून घ्या cut-off time, लाईव्ह अपडेट्स

SCROLL FOR NEXT