जालना : कोविड हॉस्पिटलमधून सुटी झालेल्या जवानांना निरोप देताना.  
मराठवाडा

चार जवानांपुढे कोरोना सरेंडर : पहा Video

महेश गायकवाड

जालना -  गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात सातत्याने कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र, एकाच दिवशी राज्य राखीव दलातील चार जवान कोरोनामुक्त झाल्याने जालनेकरांना दिलासा मिळाला आहे. तपासणीनंतर निगेटिव्ह आलेल्या जवानांना गुरूवारी (ता.१४) कोविड हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आली आहे. यावेळी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना टाळ्या वाजवून निरोप दिला. 

जिल्हयात आतापर्यंत १७ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहे. बाधीत रुग्णांमध्ये राज्य राखीव दलातील सात जवानांचा समावेश आहे. ता.२ मे रोजी राज्य राखीव दलातील चार जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या चारही जवानांवर उपचारानंतर गुरूवारी (ता.१४) त्यांच्या नमुन्यांची दोन वेळा तपासणी करण्यात आली. दोन्ही वेळा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना गुरूवारी सुटी देण्यात आली.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मधुकर राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक सत्यनारायण वैष्णव, मनोज देशमुख व कोविड हॉस्पिटलमध्ये सेवा देणारे डॉक्टर , आरोग्य कर्मचारी व सफाई कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना निरोप दिला.

सुटी दिलेल्या जवानांना खबरदारीचा उपाय म्हणून घरातच अलगीकरण करून राहण्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले. जिल्ह्यात आतापर्यंत बाधीत आढळून आलेल्या १७ पैकी सहा जणांवर यशस्‍वी उपचार झाल्यामुळे ते कोरोनामुक्त झाले असून सध्या रूग्णालयात अकरा रुग्णांवर उपचार सुरू आहे. 

  • जालना कोरोना अपडेट 
  • एकूण बाधीत रूग्ण-१७ 
  • बरे झालेले रूग्ण -६ 
  • उपचार सुरू असलेले रूग्ण-११ 
  • मृत्यू- एकही नाही 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Rajendra Yadravkar : गोकुळ प्रचारावेळी यड्रावकरांच्या ताफ्याला सैनिक टाकळीत काळे झेंडे; प्रस्तावित एमआयडीसीविरोधात संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT