crime sakal media
मराठवाडा

वसमतच्या व्यापाऱ्याची १२.६४ लाख रुपयांची फसवणुक; व्यापाऱ्या विरुध्द गुन्हा दाखल

दुसऱ्यावेळी ऑगष्ट महिन्यात १० टन हळद पाठविण्यात आली.

पंजाब नवघरे

वसमत : वसमत येथील व्यापाऱ्याकडून हळद खरेदी करून त्याचे १२.६४ लाख रुपयांचे पैसे न देता फसवणुक केल्या प्रकरणी मुंबईच्या व्यापाऱ्या विरुध्द वसमत शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. २८ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. विनोद साईगावकर (साई ट्रेडींग कंपनी, वाशी मुंबई) असे या व्यापाऱ्याचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील शेख खदीर शेख दाऊद यांचे संजरी ट्रेडींग कंपनी नावाचे भुसार दुकान आहे. या ठिकाणी शेतीमालाची खरेदी विक्री केली जाते. ता. २१ जुलै २०२१ रोजी त्यांनी वाशी येथील साई ट्रेडींग कंपनीकडे ८.२८ लाख रुपये किंमतीची १० टन हळद पाठवली. सदर ट्रक पोहोचल्यानंतर विनोद याने ४.१४ लाख रुपयांची रक्कम आरटीजीएसद्वारे शेख खदीर यांच्या खात्यावर जमा केली तर उर्वरीत रकमेचा धनादेश दिला.

त्यानंतर शेख खदीर यांच्याकडून विनोद याने आणखी हळद मागवून घेतली. दुसऱ्यावेळी ऑगष्ट महिन्यात १० टन हळद पाठविण्यात आली. मात्र त्यांनतर विनोद याने पैसे देण्यास टाळाटाळ चालवली होती. तर त्यांनी सुरवातीला दिलेला ४.१४ लाख रुपयांचा धनादेश देखील खात्यात पैसे नसल्याने वटलाच नाही. त्यामुळे शेख खदीर यांना शंका आल्याने त्यांनी पैशासाठी तगादा लागला. मात्र विनोद याने पैसे देण्यास टाळाटाळ सुरु केली. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच शेख खदीर यांनी वसमत शहर पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी विनोद साईगावकर याच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक चंद्रकांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे पुढील तपास करीत आहेत.

वसमतच्याच आणखी दोन व्यापाऱ्यांनाही घातला गंडा

मुंबई येथील याच कंपनीने वसमतच्या आणखी दोन व्यापाऱ्यांना गंडा घातल्याचे वृत्त आहे. यामध्ये एका व्यापाऱ्यास १२ लाख रुपये तर एका व्यापाऱ्याचे तीन लाख रुपये असल्याचे सुत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain News : झाडं रस्त्यावर पडल्यानं बेस्टचा खोळंबा, डझनभर मार्ग बदलले; प्रवाशांचे प्रचंड हाल

Tukaram Mundhe Water Inspection : तुकाराम मुंढेंना आता वेगळं काम; हॉटेलमध्ये मिळणारे जारमधील पाणी तपासणार, एसओपी तयार करण्याचे निर्देश

Marathi Live Updates : वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली, भोर-महाड मार्गावरील वाहतूक बंद

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची बातमी समजताच सर्वात आधी कोणाला फोन केला? स्वतःच केला खुलासा

Mumbai Rain: मुंबईत कोसळधार, तरी पाण्याची चिंता कायम! ७ धरणांच्या साठ्यात फक्त ३ टक्के वाढ, आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT