gokunda.jpg 
मराठवाडा

‘ग्रामनायकांच्या’ जीव जोखीम कामाने ग्रामस्थांचा मोकळा श्वास

स्मिता कानिंदे

गोकुंदा, (ता.किनवट, जि. नांदेड) ः किनवट तालुक्यातील डोंगरदऱ्यातील अतिदुर्गम पाड्या - गुड्यांपर्यंत कारोना प्रतिबंधात्मक उपययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत समितीअंतर्गत सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी आपल्या जिवाचं रान करून सेवा देत आहेत. त्यामुळेच तर कोरोनाच्या प्रकोपापासून निश्चिंत राहून ग्रामस्थ आपापल्या घरात मोकळा श्वास घेत आहेत. कोरोना (कोविड -१९)च्या प्रादुर्भावाने संपूर्ण जग हादरलेले आहे. यानुषंगाने केंद्र व राज्य शासनाचे निर्णय व प्रशासकीय आदेश वेळोवेळी येत आहेत. याचे तंतोतंत पालन करून गटविकास अधिकारी सुभाष धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट पंचायत समितींतर्गत पंचायत, शिक्षण, आरोग्य, बालविकास प्रकल्प या सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी ग्रामस्तरावर करीत आहेत.

ग्रामनायकांचे जीवतोड कार्य
कोणत्याही शासकीय विकासाच्या योजना ग्रामीण भागात पोचविणारा ग्रामसेवक हा महत्त्वपूर्ण घटक आहे. म्हणूनच ते ‘ग्रामनायक’ आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार तलाठी व कृषी सहायकाप्रमाणे त्यांच्यावर ते कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत गावचे नोडल-पालक अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविली आहे. शिक्षक, आरोग्य सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व पोलिस पाटील यांचेशी समन्वय ठेऊन कर्तव्य पार पाडायचे आहे. त्यांनी तालुक्यातील १३४ ग्रामपंचायतींतर्गत १९१ गाव, तांडे, गुडे पैकी ८५ टक्केगावांमध्ये सोडियम हायपोक्लोराईटचे द्रावण फवारणी, नाल्या साफसफाई व फॉगिंग मशीनने धूर फवारणी केली आहे.

कोरोना संशयितांच्या शोधासाठी घरोघरी
कोरोना संशयितांच्या शोधासाठी घरोघरी भेटी देण्याची जीव जोखीम जबाबदारी हे ग्रामनायक पार पाडत आहेत. परदेश वा संक्रमित परगावाहून आलेल्यांची दखल घेणे त्यांच्या हातावर ‘होम क्वारंटाइन’चा शिक्का मारणे. होम क्वारंटाइन व्यक्ती घराबाहेर पडत नसल्याची व त्यांची दररोज तपासणी होत असल्याची खात्री करणे, शिधापत्रिका व भोजन व्यवस्था नसलेल्या गरजू नागरिकांची यादी करणे शक्य झाल्यास दानशूरांमार्फत मदत पुरविणे, गुगल शिटवर माहिती भरणे, शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळत असल्याची खात्री करणे हे कर्तव्य ते बजावत आहेत. सहायक गटविकास अधिकारी राठोड व आरोग्य विस्तार अधिकारी विठ्ठल श्रीमनवार व पंचायत विस्तार अधिकारी कैलास रेनेवाड, सुशिल शिंदे, देविदास उडतेवार, साईनाथ चिंतावार आदींच्या नेतृत्वात ते भरीव कार्य करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT