संग्रहित छायाचित्र. 
मराठवाडा

जालना जिल्ह्यात मुली होणार संगणक साक्षर 

महेश गायकवाड

जालना,ता.६ :जिल्ह्यात ग्रामीण भागातील सातवी ते बारावी उत्तीर्ण मुलींना संगणक साक्षर करण्यासाठी महिला व बाल कल्याण विभागाने पुढकार घेतला असून त्यासाठी जिल्हा परिषदेच्या उपकर निधीतून मुलींसाठी संगणक प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत मुलींना एमएस-सीआयटी हा संगणक कोर्स शिकविण्यात येणार आहे. 

सध्याच्या आधुनिक युगात रोजगारासाठी शिक्षणबरोबर संगणक साक्षरता आवश्‍यक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींना संगणक साक्षर बनवुन त्यांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी या हेतुने जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेतून ही पावले उचलण्यात आली आहेत. त्यानुसार ग्रामीण भागातील सातवी ते बारावी उत्तीर्ण असलेल्या मुलींसाठी संगणक प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या गुरूवारी (ता.पाच) झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. योजनेतंर्गत जिल्ह्यात पंचवीस प्रशिक्षक केंद्र निश्‍चिती करण्यात आले आहे. इच्‍छुक मुलींना आपल्या गावात किंवा गावाजवळच हे प्रशिक्षण घेता यावे, यासाठी लोकसंख्या मोठी असलेल्या गावात संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात प्रशिक्षणासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल कल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता लोंढे यांनी दिली आहे. 

प्रशिक्षणासाठी सत्तर लाखाचा निधी 

योजनेतंर्गत १८५० मुलींना संगणक प्रशिक्षण देण्याचे उद्दीष्ट आहे. यासाठी सत्तर लाखाचा निधी खर्च करण्यात येणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी मातोश्री स्‍कील डेव्हलपमेंट सेंटर या संस्‍थेची निवड करण्यात आली आहे. 

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील मुली मागे पडू नये. या हेतुने ही योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. संगणक प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींचे सर्व शुल्क जिल्हा परिषदेतर्फे भरण्यात येणार आहे. सर्व मुलींनी या योजनेचा लाभ घ्यावा. 
-अयोध्या चव्हाण, सभापती 

ग्रामीण भागातील मुलींना संगणक साक्षर करण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. जास्‍तीत जास्‍त मुलींना या संधीचा फायदा घ्यावा. 
-संगिता लोंढे, 
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगे पाटील मुंबई दौऱ्यावर ठाम! मधले मुक्काम रद्द, थेट आझाद मैदान गाठणार; सोबतच्यांना माघारी जाण्याचं आवाहन

Palghar News : रुग्णालय राडा प्रकरणात कुंदन संखेसह 22 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी; राहुल घरत न्यायालयीन कोठडीत

Marathi News Live Updates : संतोष पंडित यांना जामीन मंजूर

Endometriosis & Insulin Resistance: एंडोमेट्रिओसिसचा फक्त गर्भाशयावर नाही, ब्लड शुगरवरही परिणाम होतो? नेमकं कारण काय; जाणून घ्या

UPI MDR Fee: 'यूपीआय'वरील शुल्कावरुन होणाऱ्या आरोपांना सरकारचं स्पष्टीकरण; 95 टक्के व्यवहार मोफतच...

SCROLL FOR NEXT