जालना पालिका.
जालना पालिका. 
मराठवाडा

कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेला निधी 

उमेश वाघमारे

जालना - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याचा एक भाग म्हणून राज्य 
शासनाने राज्यातील नगरपालिकांना चौदाव्या वित्त आयोगातून निधीची तरतूद केली आहे. यात अ वर्ग नगरपालिकेला १५ लाख, ब वर्ग नगपालिकेला १० लाख तर क 
नगपालिकेला पाच लाख रुपयांचा निधीची तरतूद राज्य शासनाने चौदाव्या वित्त आयोगातून केली आहे. त्यामुळे जालना नगरपालिकेसाठीही चौदाव्या वित्त 
आयोगातून १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आला आहे. 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन लागू केले आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय केंद्र सरकार, राज्यसरकारने घेतला आहे.

देशात आणि महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शासनाने नगरपालिकांना चौदाव्या वित्त आयोगातून निधीची तरतूद केली आहे. अ वर्गाच्या नगरपालिकेला १५ लाख, ब वर्ग नगपालिकेला १० लाख तर क नगपालिकेला पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यानुसार जालना नगरपालिकेला १५ लाख रुपयांच्य़ा निधी चौदाव्या वित्त आयोगातून उपलब्ध झाला आहे.

या निधीतून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ते उपयायोजना केल्या जाणार आहेत. यात शहरात औषधांची फवारणी करणे, औषधांची खरेदी करणे आदी कामांसाठी हा निधी उपयोगात आणला जाणार आहे. 

शासनाने चौदाव्या वित्त आयोगातून प्रत्येक अ नगरपालिकेला १५ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. त्यानुसार जालना नगपालिकेला ही कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, म्हणून योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी १५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. 
- नितीन नार्वेकर, मुख्याधिकारी, नगरपालिका, जालना. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT