file photo 
मराठवाडा

खेळणीतील नोटा देणारे भामटे कोठडीत

विठ्ठल चंदनकर

बिलोली (जिल्हा नांदेड) : मुखेड तालुक्यातील एका व्यक्तीला विश्‍वासात घेऊन त्याच्याकडून भारतीय चलनातील तिन लाख रुपये घेऊन त्याबदल्यात खेळणीतील (बच्चे कंपनी बँक) दहा लाख रुपयाच्या नोटा देऊन फसवणुक केली. या प्रकरणी तेलंगणातील दोन भामट्यांना अटक केली. या दोन्ही भामट्यांना बिलोली पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश पत्की यांनी ता. १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी शुक्रवारी (ता. १०) जानेवारीच्या केली. 

बिलोलीच्या नविन बसस्थानक परिसरात तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथील शेख खैसर शेख हैदर (वय ४७) आणि शेख नदीम शेख मन्नान (वय ४७) हे दोघेजण राहत होते. ते काही दिवासांपासून ते पोट भरण्यासाठी मिळेल ते काम करीत होते. परंतु त्यांनी उमरदरी (ता. मुखेड) येथील शिवलिंग बाबाराव गोंगे या लहान व्यापाऱ्याची मैत्री केली. त्यातून त्यांनी संगनमत करून शिवलिंग गोंगे यांना आम्ही नोटा बदली करून देण्याचे काम करतो. तुम्हाला पाहिजे असतील व कोणाला काही सांगणार नसाल तर आम्ही तुम्हाला ती मदत करतो. यासाठी तुम्ही तिन लाख रुपये द्या. त्या तिन लाखांच्या बदल्यात दहा लाख रुपये देतो. असे सांगून या दोघांनी त्यांच्याकडून तिन लाख रुपये घेण्याचे ठरले. परंतु चलाख असलेल्या गोंगे यांनी बिलोली पोलिसांनी ही माहिती दिली. 

बिलोली व स्थागुनशाची कारवाई 


दिलेल्या माहितीवरून बिलोली पोलिस व स्थानकि गुन्हे शाखेच्या पथकानी बिलोली बस्स्थानक परिसरात शुक्रवारी (ता. १०) सापळा लावला. तिन लाख रुपये देण्यासाठी श्री. गोंगे हा पोलिसांच्या इशाऱ्यावरून त्यांच्याकडे गेला. या दोन्ही भामट्यांना तिन लाखाच्या मोबदल्यात खळणीतील नोटा देताना रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून खेळणीतील (लहान मुलांची बँक) नऊ लाख ७० हजार रुपये (ज्यात पाचशे रुपयांचे वीस बंडल आणि चलनातील पाचशेच्या पाच नोटा ) जप्त केल्या. यानंतर शिवलिंग गोंगे यांनी फसवणूक झाल्याची झाल्याच फिर्याद दिली. बिलोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. या दोनाही भामट्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबूली पोलिसांना दिली. 

सोमवारपर्यंत पोलिस कोठडी 


पोलसांनी या भामट्यांकडून शिवलिंगला देण्यासाठी आलेल्या खेळण्यातील नोटासुद्धा जप्त केल्या आहेत. बिलोली पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणूकीसह आदी कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राम केंद्रे यांच्याकडे देण्यात आला. राम केंद्रे यांनी शेख नदीम आणि शेख कैसरला शुक्रवारी (ता. १०) बिलोली न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. न्या. पत्की यांनी सोमवार (ता. १३) जानेवारीपर्यंत त्यास पोलिस कोठडीत पाठविले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

कधीकधी भीती वाटते... 'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णीने घेतलाय लग्नाचा निर्णय; कारण सांगत म्हणाली- आई-बाबा बीडला...

Maharashtra Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाचा जीआर; पगार वाढला, फरकही मिळणार

Mumbai Police Arrest 25 Bangladeshis : मुंबई पोलिसांनी सापळा रचून २५ बांगलादेशींना केली अटक ; बनावट कागदपत्रेही जप्त

Viral Video : हेलिपॅड, 100 एकरची जागा आणि भव्य फार्महाऊस ; कोई मिल गया फेम खलनायकाची प्रॉपर्टी पाहून येईल चक्कर !

SCROLL FOR NEXT