Beed News 
मराठवाडा

गेवराई : गाढ झोपेत असताना जेसीबीने घात केला, अन त्याने बापाचा मृत्यू डोळ्यासमोर पाहिला...!

वैजनाथ जाधव

गेवराई : तालुक्यातील मारफळा तांडा येथील शेतात पाईपलाईनचे काम चालू असताना बाजूला झोपलेल्या बाप लेकाच्या अंगावर जेसीबी गेली. यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता.सहा) रात्रीच्या दरम्यान घडली. ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेत मुलाने डोळ्यादेखत वडिलांचा मृत्यू पहिला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अरे बाप रे ! मोरांना विष अन् नीलगायी, रानडुकरांना देतात शॉक ! 
तालुक्यातील मारफळा तांडा येथील अंकुश राठोड यांच्या शेतात रात्रीच्या वेळी जेसीबीने पाईपलाईन साठी खोदकाम काम सुरु होते. यावेळी साहेबराव रूपा राठोड व त्यांचा मुलगा मनोज राठोड हे बाजूला जाऊन झोपले होते. मात्र काम चालू असताना जेसीबी चालकाच्या लक्षात न आल्याने ते दोघेही जेसीबीच्या खाली आले. यात साहेबराव रूपा राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा मनोज साहेबराव राठोड गंभीर जखमी झाला आहे. 

त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी तलवाडा पोलीस दाखल झाले असून जेसीबी चालक व मालक फरार झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान, हा सगळा प्रकार नेमका कसा घडला याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. . 

डोळ्यादेखत वडील गेले, मुलाला बसला धक्का 
झोपलेल्या बाप-लेकाच्या अंगावर जेसीबी गेला. यात वडिलांचा मृत्यू झाला. तर डोळ्यादेखत आपल्या वडिलांना गमावल्यामुळे मुलाला मोठा धक्का बसला आहे. या जेसीबी चालक आणि मालक फरार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT