गोपिका कऱ्हाळे  
मराठवाडा

चिमुकलीच्या जिवावर बेतली सहलीची घाई 

दीपक सोळंके

भोकरदन (जि. जालना) -  सहलीला जाण्यासाठी उशीर होईल या घाईगडबडीत अंघोळीसाठी बाथरूममध्ये जात असलेल्या नऊवर्षीय मुलीचा पाय घसरून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. 23) सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. गोपिका बालाजी कऱ्हाळे (वय नऊ) असे मुलीचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील माळी गल्ली भागात राहणाऱ्या बालाजी कऱ्हाळे यांची गोपिका नावाची नऊ वर्षांची मुलगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत होती. या शाळेची गुरुवारी (ता. 23) सहल जाणार होती.

त्यामुळे गुरुवारी ठरल्याप्रमाणे वार्षिक सहल पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास निघणार असल्यामुळे गोपिका ही तयार होण्यासाठी उठली, सहलीला उशीर होईल या घाईगडबडीत ती अंघोळीसाठी घरासमोरील बाथरूममध्ये जात असताना अचानक तिचा पाय घसरला व समोरून तोंडावर पडली. या घटनेत तिला जबर मार लागल्याने तिला तत्काळ उपचारासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात हलविले. येथून, तिला जालना येथे उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.

या घटनेने शहरात सर्वत्र शोककळा पसरली आहे. दरम्यान, शहरातील केळणा नदीकाठी गोपिका हिच्यावर दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते. गोपिका हिच्या पश्‍चात आई, वडील, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

Marathi News Live Updates: कसबा मंदिरातील दानपेटी फोडली

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT