3drown_5_0_0 
मराठवाडा

शेततळ्यात बुडून मुलीचा मृत्यू, आजीच्या अंत्यविधीसाठी कुटुंबीयांसोबत आली होती गावी

शितलकुमार शिंदे

बेंबळी (जि.उस्मानाबाद) : बेंबळी येथून जवळच असलेल्या शिवाजीनगर (ता.उस्मानाबाद) येथील एका सात वर्षीय लहान मुलीचा बुधवारी (ता.२१) शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. वैष्णवी कुणाल सोनटक्के असे मृत मुलीचे नाव आहे. उस्मानाबाद शहरात राहणारे वैष्णवीचे कुटुंब तिच्या आजीच्या अंत्यविधीसाठी शिवाजीनगर येथे आले होते. मंगळवारी (ता.२०) वैष्णवीची आजी शोभा सोनटक्के यांचा मृत्यू झाला होता.

दुसऱ्यादिवशी बुधवारी सकाळी घरातील सर्व मंडळी अंत्यविधीसाठी गेल्यानंतर घरामागे असलेल्या शेततळ्यात लहान मुले खेळत होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान शेततळ्यात गेलेली ही मुले येथील अन्य एका मोठ्या मुलीने पाहून आरडाओरडा केल्याने लोकांनी त्यांना बाहेर काढले. तिघांना बेंबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. मात्र तोपर्यंत वैष्णवीचा मृत्यू झाला होता. अन्य दोघा मुलांची तब्येत चांगली असल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे, असे बेंबळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित राठोड यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Emotional Message : राहुल गांधी भावूक; वडिलांची आठवण काढत आई सोनिया गांधींसाठी खास संदेश

ZODIAC SIGNS: राग आला तरी लगेच शांत होतात! ‘या’ राशीनच्या मुली असतात मनाने खूप हळव्या; ओळखा स्वभाव!

Kas Plateau Flower Season 2026 : कास पठारावरील फुलांचा हंगाम 'या' तारखेपासून होणार सुरू; ऑनलाईन बुकिंग कधी? हुल्लडबाजी करणाऱ्यांना बसणार चाप

Latest Marathi News Live Update : ऑगस्टमध्ये मराठवाडा आणि विदर्भ कोरडे; सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची आशा

Ayushman Card : कोणताही प्रीमियम न भरता मिळवा फ्री Health Insurance, फक्त WhatsApp वर ‘Hi’ ... जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

SCROLL FOR NEXT