मराठवाडा

या जिल्ह्यात ग्लॅन्डर्ससदृष्य आजाराचा शिरकाव

जगन्नाथ पुरी

सेनगाव (जि. हिंगोली): तालुक्यातील वलाना येथे ग्लॅन्डर्ससदृश आजाराची एका घोडीला लागण झाल्याचा प्रकार सोमवारी (ता. ३०) उघडकीस आला आहे. ग्लॅन्डर्स हा संसर्गजन्य जीवघेणा आजार असून इतर प्राण्यांसह मनुष्यालाही आजाराची लागण होते. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने घोडीची तपासणी करून विविध नमुने संकलित केले आहेत. हे नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेकडे पाठविले असून तेथून ते राष्ट्रीय अनुसंधान केंद्र हिसार येथे पाठवली जाणार आहेत.

सेनगाव तालुक्यातील वलाना येथील गजानन पाटील यांनी दोन लाख रुपयांची घोडी खरेदी केली आहे. काही दिवसांपासून सिद्धी नामक या घोडीला अंगावर ठिकठिकाणी जखमा झाल्या आहेत. नाकालाही जखमा झाल्या असून पाणीस्त्राव होत आहे. सदरील माहिती पशुसंवर्धन विभागाला त्यांनी दिली. पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. गौस मोहम्मद खान, पशुसवर्धन विकास अधिकारी डॉ. बी. ए. गवळी, डॉ. समीर भालके, डॉ. बांगे यांच्या पथकाने वलाना येथे सोमवारी (ता. ३०) भेट दिली.

नमुने संकलित केले

 घोडीला ग्लॅन्डर्ससदृश आजार झाल्याचे निदर्शनास आले असून घोडीचे विविध नमुने संकलित केले आहेत. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. लक्ष्मण पवार व जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. घुले यांच्या मार्गदर्शनानुसार हे नमुने विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहेत. तिथून हे नमुने लवकरच राष्ट्रीय अश्व अनुसंसाधन केंद्र हिस्सार येथे तपासणीसाठी पाठवली जाणार आहेत.

ग्लॅन्डर्स आजाराची लक्षणे

हिंगोली जिल्ह्यात अंदाजे दोन हजार घोडे असल्याचे सांगण्यात येते. इतर प्राण्यांप्रमाणेच घोड्यालाही नैमित्तिक व संसर्गजन्य रोग होतात. त्यामुळे देखभालीकडे विशेष लक्ष दिले जाते. या प्राण्यांना दुर्मिळ ग्लॅन्डर्स नामक जीवघेणा आजार जडल्यावर त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा होतात. नाकातून स्त्राव होतो. तेथेही जखमा होतात. या प्राण्यापासून इतर पशू, प्राणी व मनुष्यांना आजाराची लागण होण्याची शक्यता असते. हा आजार जीवघेणा असल्यामुळे त्याचा प्रसार होणार नाही याची विशेष खबरदारी घेतली जाते.

हिसार (हरियाणा) येथे तपासणी

आजार झाला किंवा त्याची लक्षणे दिसून आली की तत्काळ त्या प्राण्याची विविध नमुने पशुसंवर्धन विभागाकडून संकलित केली जातात. सदरील नमुन्यांची राष्ट्रीय संशोधन केंद्र हिसार (हरियाणा) येथे तपासणी होऊन त्या बाबतचा अहवाल पाठविला जातो. पॉझिटिव्ह अहवाल आल्यावर भारत सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाते. वैज्ञानिक पद्धतीने विष देऊन प्राण्यांना ठार केले जाते व त्या प्राण्याला आठ ते दहा फूट खड्डा खोदून पुरून टाकल्या जाते.

डोके, छातीत वेदना

घोडा, गाढव, खेचर प्राण्यांच्या प्रजातींतून संसर्गजन्य प्रसाराची ही बिमारी आहे. विशेष बॅक्टेरियाने त्याचा इतरत्र संसर्गजन्य प्रसार होतो. या बिमारीची मनुष्याला लागण झाल्यास मांसपेशी आखडतात. डोके व छातीत वेदना होतात. नाकातून पाणीस्त्राव होणे यासह विविध लक्षणे दिसून येतात.

सतर्क राहण्याबाबत मार्गदर्शन

सेनगाव तालुक्यातील वलाना येथे ग्लॅन्डर्ससदृश्य आजाराचे लक्षण एका घोडीला असल्याची माहिती कळताच तेथे भेट देऊन विविध नमुने संकलित करून विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आली आहेत. या बाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे मार्गदर्शन केले आहे.
-डॉ. मोहम्मद खान, सहायक आयुक्त पशुसंवर्धन, हिंगोली

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! CJP च्या दोन मागण्या सरकारकडून मान्य, तिसरीसाठी उद्या पर्यंतची मागितली वेळ, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलीस चौकीसमोरच गोळीबार, तीन राऊंड फायर, एक जण जखमी

Crime News: पहिल्या पतीचं निधन, दुसऱ्यानं सोडलं; नंतर पत्नीनं तिसऱ्या नवऱ्याला जिवंत जाळून संपवलं, धक्कादायक कारण समोर

Vaibhav Sooryavanshi : वैभवने विश्वविक्रमानंतर 'A' अक्षर का दाखवले? जाणून घ्या सेलिब्रेशनमागची हृदयस्पर्शी गोष्ट

Pune Crime: पुण्यात पोलीस चौकीसमोरच तरुणावर झाडल्या गोळ्या, धक्कादायक घटनेने शहरात खळबळ; नेमंक काय घडलं?

SCROLL FOR NEXT