नवीन नांदेड ः नालंदा प्रवेशद्वारावरील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या नावातील शब्द गळून पडत आहेत. 
मराठवाडा

‘या’ कमानीवरील शब्दांची गळती 

श्याम जाधव

नवीन नांदेड ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर देखणे असे नालंदा प्रवेशद्वार आहे. अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शेकडो विद्यार्थी याच ठिकाणाहून विद्यापीठात प्रवेश करतात, परंतु, विद्यापीठाचे मुख्य आकर्षण असलेल्या नालंदा प्रवेश कमानीवरील अक्षर पडल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठासाठी ऐतिहासिक असलेल्या या कमानीकडे विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष नाही ही नवलाची गोष्ट आहे.
नांदेडसह परभणी, हिंगोली, लातूर या जिल्ह्याचे कार्यक्षेत्र विद्यापीठाचे आहे. येथे दररोज विद्यापीठात या जिल्ह्यातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षण तज्ञ कामानिमित्त येत असतात. नांदेडसाठी कुठलाही संघर्ष न करता मिळालेल्या चार जिल्ह्याचे वैभव असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने कमी कालावधीत नॅककडून ‘अ’ दर्जा प्राप्त करून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात सर्वांगीण विकासाकडे आगेकूच करत 550 एकरावर पसरलेले विद्यापीठ समृद्ध अशा जैव-विविधता बरोबरच अद्ययावत अशा पायाभुत सुविधा देत आहे. 

विद्यापीठ चौथ्यांदा ‘नॅक’ समितीला सामोरे जाणार 
नुकताच विद्यापीठाने पंचविसावा रौप्यमहोत्सव साजरा केला. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अनेक उपक्रम राबविण्यात आले. शिवाय विद्यापीठात आंतरराष्ट्रीय कार्यशाळा पार पडल्या. दरम्यान, येणाऱ्या कालावधीत विद्यापीठ चौथ्यांदा ‘नॅक’ समितीला सामोरे जाणार आहे. त्यादृष्टीने आतापासून विद्यापीठ तयारीही सुरू करीत आहे.

कमानीमुळे विद्यापीठाच्या सौंदर्यात मोलाची भर
स्वारातीम विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारती समोरील विद्यापीठाच्या सौंदर्यात मोलाची भर टाकणाऱ्या नालंदा प्रवेश कमानीवरील नावातील अक्षर अनेक दिवसांपासून गळून पडले आहेत. रामानंद मधील ‘द’ आणि मराठवाडा मधील ‘ठ’ हे शब्द गळून पडले आहेत. परंतु, प्रशासनाचे याकडे लक्ष नाही.

विद्यापीठ प्रशासन देखरेखीबाबत उदासीन
याच मार्गावरून विद्यापीठाचे अनेक अधिकारी विद्यापीठात येतात. परंतु, अनेकांकडे चारचाकी वाहन असल्याने कदाचित याकडे लक्ष गेले नसावे, गेले असेल तर त्यात नावात काय आहे, असे म्हणून दुर्लक्ष केले गेले असावे. परंतु, नुकताच विद्यापीठात पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषणमुक्तीसाठी राबविलेल्या ‘नो व्हेईकल डे’ उपक्रमानिमित्त अनेक अधिकाऱ्यांनी या मार्गाने पायी कार्यालय गाठले. परंतु, पायी चालताना एकाही अधिकाऱ्याचे लक्ष गेले नाही हे विशेष. दरम्यान, देखरेखीबाबत विद्यापीठ उदासीन असल्याचे चित्र दिसून येते. याकडे लक्ष देत नावात दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Suraksha Bill : मुख्यमंत्री फडणवीसांनी विधिमंडळात मांडलं 'जनसुरक्षा' विधेयक ; जाणून घ्या, यावेळी काय म्हणाले?

Thane News: घोडबंदर रस्ता होणार पालिकेचा, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?

Crime: ७ ते १२ वयोगटातील मुलांनी टोळी बनवली; चविष्ट जेवण खाण्यासाठी नको ते कृत्य, चौकशीत पोलिसही अवाक्, नागपुरात काय घडलं?

IND vs ENG 3rd Test: W,1,0,W! नितीश कुमार रेड्डीने पहिल्याच षटकात इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना पाठवले माघारी, Video

Crime News : 'छोटी भाभी' प्रकरणातील बडतर्फ हवालदार युवराज पाटील अखेर अटकेत

SCROLL FOR NEXT