Latur Crime News
Latur Crime News 
मराठवाडा

घरात येऊन अंगावरचे चक्क २० तोळे सोने पळविले, लातुरातील पहिलीच घटना

सकाळ वृत्तसेवा

लातूर : टाळेबंदी शिथिल होताच चोऱ्या, घरफोड्यांना पुन्हा सुरवात झाली आहे. दुचाकी चोरीच्या घटनाही दिवसाआड घडू लागल्या आहेत. त्यातच आता घरफोडी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत तब्बल २० तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्याने पळवून नेले आहेत. विशेष म्हणजे, हे दागिने अंगावर घातलेले होते. मोठ्या शिताफीने ते चोरट्याने लांबविले आहे. अशा प्रकारची घटना लातुरात प्रथमच घडल्याचे पोलिसांनी सांगितले.


ही घटना विशालनगर भागात मंगळवारी (ता.२६) पहाटे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. या भागात मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता आर. बी. माने यांचे घर आहे. चोरट्यांनी खिडकीतून मुख्य दरवाजाची कडी तोडली आणि माने यांच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी घरातील हॉलमध्ये सर्व व्यक्ती झोपलेल्या होत्या. यापैकी महिलेच्या गळ्यातील नऊ तोळ्यांचे गंठण, आठ तोळ्यांच्या पाटल्या, दोन तोळ्यांची एक बांगडी आणि सात ग्रॅमची तुळशीची माळ चोरट्यांनी पळविली.


अंगावरील सोने हिसकावून पळवून नेण्याचे अनेक प्रकार शहरात घडले आहेत; पण संबंधित व्यक्तीला कळू न देता, ती झोपेत असताना सोने पळवून नेण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. चोरट्यांनी घरातील इतर कुठल्याही वस्तूला हात लावला नाही. रोख रक्कमही चोरली नाही. अशा प्रकारच्या घटनेमुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. बांगड्यांच्या मागे असलेल्या पाटल्या चोरट्यांनी पळविल्या आहेत; पण बांगड्या हातात तशाच आहेत. यावरून चोरट्याने पाटल्या कटरने कापून नेल्या असाव्यात आणि चोरी करण्याआधी माने कुटुंबीयांच्या अंगावर गुंगी आणणारा स्प्रे मारला असावा, असा प्राथमिक अंदाज सध्या वर्तविला जात आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. २६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पथकही नेमले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT