आमदार राजू नवघरे 
मराठवाडा

Good News : शिरड शहापूर येथे आदिवासी आश्रम शाळेसाठी साडेचौदा कोटी मंजूर- राजू नवघरे

वसमत मतदार संघातील तसेच परिसरातील अनुसूचित जमातींच्या मुला- मुलींना उच्च शिक्षणाची सोय व्हावी व त्यांची शैक्षणिक उन्नती व्हावी या उद्देशाने शिरडशहापूर ता. औंढा नागनाथ येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा उभारण्यात अशी अपेक्षा पालकांमधून व्यक्त केली जात होती.

संजय बर्दापूरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील शिरडशहापुर येथे आदिवासी आश्रमशाळा उभारणीला मंजुरी मिळाली असून त्यासाठी १४ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार राजू नवघरे यांनी दिली.

वसमत मतदार संघातील तसेच परिसरातील अनुसूचित जमातींच्या मुला- मुलींना उच्च शिक्षणाची सोय व्हावी व त्यांची शैक्षणिक उन्नती व्हावी या उद्देशाने शिरडशहापूर ता. औंढा नागनाथ येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा उभारण्यात अशी अपेक्षा पालकांमधून व्यक्त केली जात होती. तसेच याबाबत वसमत मतदारसंघातील नागरिकांनी आमदार राजू नवघरे यांच्याकडे मागणी केलु होती.

हेही वाचा - नांदेड महापालिकेच्या हद्दवाढीवरुन राजकारण नको; विकासावर व्हावी चर्चा

आमदार राजू नवघरे व आदिवासी प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी आश्रमशाळेच्या मंजुरीसाठी व निधीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण सोबतच निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी औंढा तालुक्यातील शिरडशहापूर येथे आश्रम शाळा उभारण्यासाठी मंजुरी मिळाली असून इमारत बांधकामासाठी १४ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार राजू नवघरे यांनी दिली. आश्रमशाळेला निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आमदार राजु नवघरे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच मंत्री श्री. पाडवी यांचे आभार मानले आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओला-उबर प्रवाशांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे चार नवे निर्देश; धोरणात मोठे बदल

Peshwa Descendants : पेशव्यांचे वंशज सध्या कुठे आहेत? कशी आहे त्यांची आत्ताची परिस्थिती..पाहा इतिहासातून वर्तमानाचा उलगडा

बाबर आझम जर तुमचा प्रमखु खेळाडू असेल...; भारताच्या माजी कर्णधाराने केला पाकिस्तानचा अपमान! म्हणाले, भारताची 'C' टीम यांना हरवेल

लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी ६; खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास

Vaibhav Suryavanshi 10th Exam : वैभव सूर्यवंशी दहावीच्या बोर्ड परीक्षेला बसणार नाही; जाणून घ्या त्यामागचं कारण...

SCROLL FOR NEXT