file photo 
मराठवाडा

गुड न्युज : ५५ जणांचे अहवाल आले निगेटीव्ह  

गणेश पांडे

परभणी : कोरोना विषाणू संदर्भात गुरुवार (ता.२६) पर्यंत घेतलेल्या ८१ स्वॅब पैकी ५५ जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. ११ स्वॅबचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.
कोरोना विषाणू संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी काढलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. की गुरुवार (ता.२६) पर्यंत १३० संशयीत रुग्णांची नोंद झाली आहे. ८१ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी ५५ नेगेटीव्ह असून ११ स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत.

११९ नागरिकांचे घरात विलगीकरण
 राष्ट्रीय विषाणु संस्था पुणे यांनी १५ स्वॅबच्या तपासणीची आवश्यकता नसल्यचा निर्वळा प्रयोगशाळेने दिला आहे. जिल्ह्यात ५४ जण परदेशातून आलेले आहेत. इतर राज्यातील ३ असे ५७ नागरिक निगराणीखाली आहेत. या नागरिकांपैकी तीन नागरिकांचे विलगीकरण करण्यात आले आहे. तर ११९ नागरिकांचे त्यांच्या घरात विलगीकरण करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.

हेही वाचा....

जमिनीवर बसून भाजीविक्री नाही
परभणी : शहरातील सर्व सार्वजनिक शौचालय तातडीने सुरु करून घ्यावेत तसेच भाजीपाला विक्रीसाठी जमिनीवर न बसता हातगाड्यावर सकाळी ११ वाजेपर्यंत भाजी विक्री करावी, असे आदेश महापालिका प्रशासनाच्यावतीने गुरुवारी (ता.२६) सांयकाळी देण्यात आले आहेत.

परभणी महापालिकेच्यावतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक पध्दतीने पावले उचलली आहेत. प्रशासनाने गुरुवारी (ता.२६) सांयकाळी नियमावली लागू केली आहे. यात  सर्व सार्वजनीक शौचालय चालू राहतील याची दक्षता घेण्याचे आदेश स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आले आहेत. भाजीपाला विक्रीसाठी एकाच ठिकाणी जमिनीवर बसून न राहता हातगाड्याद्वारे सकाळी ११. ०० वा पर्यंतच विक्रीसाठी चालू राहतील याची दक्षता घ्यावी, एकाच ठिकाणी जमिनीवर बसून होणारी भाजपाला विक्री बंद करावी. 

घरपोच सामान देण्याच्या सूचना करा
प्रभागातील सर्व किराणा दुकानदारांना फोनवरच किराणा सामानाची ऑर्डर घेऊन घरपोच सामान देण्याच्या सूचना कराव्यात. दुकानावर गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना कराव्यात, नागरिकांना भाजीपाला / किराणा सामान खरेदीसाठी घराबाहेर पडू नये, अशा सूचना कराव्यात, शहरातील सर्व प्रभागात सायंकाळच्या वेळी टप्प्या टप्प्याने मलेरिया वाहनाने धूर फवारणी करुन घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT