फोटो 
मराठवाडा

Good news- कोरोना चाचणी आता परभणीतच होणार...

गणेश पांडे

परभणी : कोरोना विषाणूची लागण झाली आहे की नाही याची तपासणी आता परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात केली जाणार आहे. त्यासाठी यंत्रणा, सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे परभणी येथे कोरोना संशयीत आढळल्यास त्याचा वैद्यकीय अहवाल काही तासातच मिळणार आहे. ही परभणीकरांसाठी एक दिलासादायक घटना आहे.

गेल्या दीड दोन महिन्यांपासून येथील जिल्हा शासकीय रुग्णालय किंवा तालुकास्थानच्या रुग्णालयातून संशयित अशा रुग्णांचे स्वॅब घेतले जात होते. येथून ते पुण्यातील राष्ट्रीय विषाणु संस्थेच्या प्रयोगशाळेकडे खास वाहनाद्वारे पाठविल्या जात होते. दोन-तीन दिवस तेथील त्या स्वॅबच्या अहवालाची प्रतिक्षा करावी लागत होती. या प्रक्रियेत मोठा विलंब, खर्च सुध्दा होत होता.

संशयीत अशा रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त होवू लागले.

आरोग्य विभागाने औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेतून सुविधा उपलब्ध केल्यानंतर पुण्याऐवजी येथून औरंगाबादला संशयित रुग्णांचे स्बॅव पाठविल्या जात होते. त्यासाठी सुध्दा दोन दिवस प्रतिक्षा करावी लागत. या दरम्यान, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेत स्वॅबच्या चाचण्यां सुरु झाल्या. त्यामुळे एकदीड दिवसांतच संशयीत अशा रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त होवू लागले.

पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञांची मदत

या पार्श्‍वभूमीवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातच कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅबच्या चाचणीची सुविधा उपलब्ध झाली आहे. रुग्णालयातील काही यंत्र तसेच येथील शिसोदिया पॅथॉलॉजीने उपलब्ध केलेल्या मशिनरीमुळेच हे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञांच्या मदतीने तयारी सुरू केली आहे. 

टेस्टिंगचे कामही तातडीने सुरू

जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या संशयीत रुग्णांच्या स्वॅबच्या चाचणीची सुविधा उपलब्ध झाल्या बरोबर नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रयोगशाळेने त्यांच्याकडील काही स्वॅब तपासणीकरिता परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे ट्रायल स्वरूपात टेस्टिंगसाठी पाठविले असून त्या स्वॅबच्या चाचणासंबंधीचं काम सुध्दा शासकीय रुग्णालयात बुधवारी (ता.१३) रात्री सुरू झाले. त्यासाठी नागपूर येथील एम्सने हिरवा कंदील दाखविला असून या टेस्टींगच्या प्रक्रियेतील रिझल्टनंतरच आरोग्य विभागाद्वारे त्यास रितसर परवानगी मिळेल.
- डॉ.बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा शल्यचिकित्सक, परभणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Airlines: एअर इंडिया-इंडिगोनंतर विमान क्षेत्रात नवा खेळाडू! अदाणी समूहाची लवकरच नव्या क्षेत्रात एन्ट्री?

भाजपला ८५० जागाच का हव्यात? राहुल गांधींनी सांगितलं नेमकं कारण; डिलिमिटेशनवरून मोदी सरकारला घेरलं

Who Is Ankon Aich: एका षटकात ६ षटकार, १३२ चेंडूंत २३६ धावा; चर्चेत आलेला अंकन आईच नेमका कोण आहे?

Delimitation Bill 2026 : राज्यांच्या विधानसभा जागा ६५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव; १३२व्या घटनादुरुस्ती विधेयकावर अमित शहांचे मोठे विधान

Marathi News Live Updates: व्यंगचित्रकारांची मुस्कटदाबी सहन करणार नाही- गौरव सर्जेराव

SCROLL FOR NEXT