karona 
मराठवाडा

आनंद वार्ता : हिंगोलीत आणखी पाच रुग्ण कोरोनामुक्त 

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व निगेटिव्ह अहवाल आलेल्या कोरोनामुक्त पाच रुग्णांना गुरुवारी (ता. २१) घरी सोडण्यात आले. यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९० वर पोचली आहे.

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत शंभर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, येथील जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांकडून करण्यात येत असलेल्या उपचारामुळे रुग्ण ठणठणीत बरे होत आहेत. त्यामुळे आतापर्यंत तब्बल ९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

दहा बाधित रुग्णावर उपचार

दरम्यान, जिल्ह्यातील सहा एसआरपीएफच्या जवानांना औंरगाबाद येथील धूत हॉस्पिटल येथे उपचाराकरिता भरती करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. यातील पाच रुग्णांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आता जिल्ह्यात कोविड-१९ चे एकूण दहा रुग्ण बाधित असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार सुरू आहेत.

आरोग्याची काळजी घ्यावी

 नागरिकांनी सतर्क राहून कोरोना विरुद्ध लढ्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घरी थांबून आपले आणि आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

शंभर खाटांचे कोविड हॉस्पिटल तयार

हिंगोली : येथील औंढा रोडवरील अल्‍पसंख्याक भवनाच्या इमारतीत नव्याने शंभर खाटांचे अद्यावत कोविड हॉस्पिटल तीन आठवड्यांतच तयार करण्यात आले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत हे हॉस्पिटल कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे.

तीन आठवड्यात हॉस्पिटल तयार

काही दिवसांपासून सर्वत्र कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. आता प्रशासनदेखील सतर्क होत आहे. हिंगोली जिल्ह्यात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने अवघ्या तीन आठवड्यांमध्ये नवीन अद्यावत कोविड हॉस्पिटल तयार केले आहे. 

डॉ. मंगेश टेहरे यांची माहिती

हिंगोली शहरातील औंढा रोडवरील अल्पसंख्याक भवनच्या इमारतीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या आदेशाने शंभर खाटांच्या हॉस्पिटलमध्ये वर्ग करण्यात आले आहे.
दोन ते तीन दिवसांत हे हॉस्पिटल कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेत दाखल होणार असून या ठिकाणी व्हेंटिलेटर, डायलेसिस, कृत्रिम ऑक्सिजन अशी सर्व अद्यावत उपकरणे बसविण्यात आली आहेत. याचा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांना मोठा फायदा होणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश टेहरे यांनी सांगितले.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीच्या नावावर अश्लीलतेला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घ्यावं लागेल प्रमाणपत्र, त्यानंतरच परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

कार उलटल्यानंतर ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू; देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जण गंभीर

Shravan Belpatra Rules: बेलाचं पान कधी तोडावं? कधी तोडू नये? 'या' चुकांमुळे लागू शकतो दोष; जाणून घ्या योग्य नियम

Independence Day Live Update : पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण, चंद्रकांत खैरेंचा कानमंत्र; दानवेंची गळाभेट चर्चेत

FDA Action: डॉमिनोजनंतर तुकाराम मुंढेंचा झेप्टो, इन्स्टामार्टसह फ्रुटीवर प्रहार; ११ तास छापेमारी, १४ परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT