corona  
मराठवाडा

गुड न्युज ः परभणी जिल्ह्यात दोन दिवसात कोरोनामुळे एकाचाही मृत्यु नाही

गणेश पांडे

परभणी ः जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गामुळे मृत्युदर वाढलेला असताना एक चांगली बातमी समोर येत आहे. गेल्या दोन दिवसात कोरोना संसर्गामुळे मृत्यु पावणाऱ्यांची संख्या शुन्यावर आली आहे. महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या रॅपीड ॲन्टीजन टेस्टमध्ये ही कुणीच पॉझिटिव्ह आढलेले नाही. परंतू, इतर ठिकाणी मात्र ३८ जण नव्याने बाधित झाले आहेत. 

परभणी जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सहा हजार १३२ वर गेली आहे. त्यातील पाच हजार ४४२ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या कोरोना विषाणु संसर्गाचा उपचार घेणाऱ्यांची संख्या जिल्ह्याभरात ४३७ ऐवढी आहे. २५३ जणांचा आतापर्यंत मृत्यु झाला आहे. मंगळवारी (ता.१३) दिवसभरात ३८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असले तरी दुसरीकडे ९१ रुग्णांनी कोरोनावर मात करून ते सुखरुप घरी परतले आहेत. 

व्हॅकेंट बेडची संख्या वाढली 
जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार आता थंडावला असल्याचे दिसत आहे. कारण गेल्या दोन दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४० च्या खाली आली आहे. सोमवारी २५ तर मंगळवारी ३८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. ऐरवी जिल्ह्यात दिवसागणीक ८० ते ९० रुग्णांची नोंद होत होती. त्यामुळे ही एक आनंदाची बातमीच म्हणावी लागेल. जिल्ह्यात सरकारी व खासगी रुग्णालय तसेच इतर ठिकाणी तयार केलेल्या ३३ कोविड सेंटरमध्ये एक हजार ६७० खाटांची उपलब्धता करून देण्यात आली होती. परंतू, आता केवळ ४०३ खांटावर रुग्ण असल्याने सध्या एक हजार २६७ खाटा रिकाम्या आहेत. त्यात होम आयसोलेशन ३४ आहेत. 

दोन दिवसात एकही मृत्यु नाही 
सोमवार व मंगळवार या दोन दिवसात जिल्ह्यात एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यु झालेला नाही. तसेच दोन दिवसात १५६ रुग्णांनी कोरोनावर विजय संपादन करून आपल्या कुटूंबात परतले आहेत. 


रॅपिड अँटीजेन तपासणी; मंगळवारी एकही पॉझिटिव्ह नाही 
परभणी शहर महापालिकेच्या वतीने मंगळवारी (ता.१३) रोजी शहरातील चार केंद्र, सात खासगी रुग्णालयात ८६ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यात ८६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. जायकवाडी येथील मनपा रुग्णालयात ११, सिटी क्लब आठ, खंडोबा बाजार आरोग्य केंद्रात चार, इनायतनगर आरोग्य केंद्रात ४३ तर खासगी रुग्णालयात २० व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. शहरातील नागरिकांनी ताप, सर्दी, खोकला, अंग दुखणे आदी लक्षणे आढळल्यास तत्काळ रॅपिड अ‍ॅंटीजेन टेस्ट करून करून घ्यावी. कोरोनाबाधित व्यक्तीस होम क्वारंटाइन होऊन उपचार घेता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी रॅपिड अ‍ॅंटीजेन टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.  

 
परभणी जिल्हा 
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ः सहा हजार १३२ 
एकूण बरे रुग्ण ः पाच हजार ४४२ 
आजपर्यंतचे मृत्यु ः २५३ 
आज रोजी उपचार घेणारे ः ४३७ 
आजचे पॉझिटिव्ह ः ३८ 
आजचे बरे रुग्ण ः ९१ 
आजचे मृत्यु ः एक 

संपादन ः राजन मंगरुळकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: पुढील ५ दिवस महत्त्वाचे! नोव्हेंबरमध्येही कोसळणार मुसळधार; हवामान विभागाचा अलर्ट

Latest Marathi News Live Update : शेतकरी आंदोलन थोड्याच वेळात संपणार

Akola News: अकोला जिल्ह्याची सुपीकता घटली; सूक्ष्म अन्नद्रव्यांची तीव्र कमतरता, अभ्यासातून चिंताजनक निष्कर्ष

Female Cancer: तरुण महिलांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण; स्तन कर्करोगाविषयी जागरूकता ही काळाची गरज !

Wardha Crime: नातीने केली आजीच्या घरी चोरी; चोरीच्या मुद्देमालातून खरेदी केली कार, दुचाकी, आयफोन

SCROLL FOR NEXT