Good news for students! Drought affected students educational fees waived 
मराठवाडा

विद्यार्थ्यांसाठी खूशखबर ! दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ

अतुल पाटील

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्यूत्तर विभागात शिक्षण घेत असलेल्या अतिवृष्टी आणि ओला दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. ओला दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मुलांवर आर्थिक संकट कोसळले असल्यानेच हा निर्णय घेण्यात आला आहे. 

मुंबईतील नवीन उत्तम लोकलबद्दल 'या' आहेत मुंबईकरांच्या प्रतिक्रिया

कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता.सात) व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. बैठकीत डॉ. येवले म्हणाले, मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आपले विद्यापीठ कष्टकरी कुटूंबातून आलेले विद्यार्थी यांचे म्हणून ओळखले जाते. अनेक विद्यार्थी हे त्यांच्या कुटूंबातून पहिल्यांदाच पदव्यूत्तर शिक्षणापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या पदव्यूत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे 2019-2020 या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, असा ठराव कुलगुरुंनी मांडला. सर्व सदस्यांनी एकमताने हा प्रस्ताव मंजूर केला. दरम्यान, दुष्काळग्रस्त भागातील गावे याबद्दल शासन निर्णय असेल, त्याप्रमाणे या गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात येईल, असेही यावेळी ठरले. 

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या विरोधात याचिका दाखल

विद्यापीठाच्या मुख्य परिसरातील 42 विभाग आणि उस्मानाबाद उपपरिसरातील दहा विभागातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. औरंगाबाद मुख्य परिसरात विविध अभ्यासक्रमात 4 हजार 639 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर उस्मानाबाद उपपरिसरात दहा विभागात 450 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बैठकीस प्र-कुलगुरु डॉ. प्रविण वक्‍ते, राज्यपाल नियुक्त सदस्य किशोर शितोळे, कुलसचिव डॉ. साधना पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर, डॉ. मुरलीधर लोखंडे, डॉ. भालचंद्र वायकर, प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, डॉ. हरिदास विधाते, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. राजेश करपे, डॉ. राहुल मस्के, डॉ. नरेंद्र काळे, सुनिल निकम, डॉ. अशोक देशमाने, संचालक डॉ. सतीश देशपांडे, राजेंद्र मडके, डॉ. गणेश मंझा यांची उपस्थिती होती. 


सामाजिक बांधिलकीतून निर्णय -कुलगुरु 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानावाच्या नावाने चालणाऱ्या आपल्या विद्यापीठात शोषित, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी अधिक प्रमाणावर शिक्षणासाठी येत आहेत. यंदा सुरुवातीला दुष्काळ तर नंतर अतिवृष्टी यामुळे मराठवाडा, विदर्भातील शेतकरी यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. या शेतकरी शेतमजूर कुटूंबातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात टिकून रहावे. यासाठी व सामाजिक बांधिलकीतून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! बदला घेण्यासाठी शिक्षकाने 426 विद्यार्थ्यांच्या अन्नात घातलं फिनाईल; आरोपी शिक्षकाला तत्काळ अटक, नेमकं काय घडलं?

आम्हाला कोणी वेगळं नाही करु शकतं, गणेशोत्सवात गोविंदा-सुनिता एकत्र, सुनीता म्हणाली...'गोविंदा फक्त माझाय.'

Panchang 28 August 2025: आजच्या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे

Manoj Jarange : शिवनेरी किल्ल्यावरुन तुम्हाला शब्द देतो... मनोज जरांगेंचे फडणवीसांना मोठे आवाहन

Indian Army : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी चकमक; एलओसीलगत घुसखोरीचा प्रयत्न, लष्कराच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT