halad 
मराठवाडा

हळदीचा उताराही झाला कमी अन् उत्पादन खर्चही निघेना, कुठे ते वाचा...

मारोती काळे

कुरुंदा ः वसमत तालुक्‍यातील कुरुंदा व परिसरातून जाणाऱ्या इसापूर तसेच येलदरी कालव्याच्या पाणाच्या आधारावर सिंचनाखाली येतो. यामुळे या भागात हळदीच्या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. सध्या हळद काढण्यास सुरवात झाली आहे. एकरी बारा क्‍विंटलचा उतारा येत आहे. हळदीला साडेपाच ते साडेसहा हजार रुपये क्‍विंटलचा भाव मिळत असल्याने त्‍यासाठी झालेला खर्चच अधिक होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

कुरुंदा भागातून इसापूर व येलदरी या दोन्ही धरणांचे कालवे जातात. यामुळे काही भागातील शेतकऱ्यांना त्‍याचा लाभ होतो. तसेच कुरुंदवाडी, कोठारी, पिंपराळा, डोणवाडा, सुकळी, दाभडी, नेहरूनगर, महादेववाडी आदी ठिकाणी दोन हजार हेक्‍टर हळदीची लागवड झाली आहे. कालव्याला आलेल्या पाण्यावर हळदीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी घेतले आहे. सध्या हळद काढणी अंतिम टप्प्यात आली आली आहे.

हळदीचे उत्‍पादन या वर्षी घटले
हळद काढणीस मजुरांनी एकरी साडेदहा ते अकरा हजार रुपये एवढा भाव घेतला जात आहे. तसेच हळद लागवडीपासून काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला आहे. वातावरणाच्या परिणामामुळे हळदीचे उत्‍पादन या वर्षी घटल्याचे शेतकरी सांगत आहेत. मागच्या वर्षी एकरी पंधरा क्‍विंटलचा उतारा आला होता, तर या वर्षी मात्र बारा ते तेरा क्‍विंटला एकरी हळद होत आहे. सध्या लॉकडाउनमुळे बाजारपेठत हळदीला साडेपाच ते साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.

मिळालेल्या भावाबद्दल नाराजी
काही शेतकऱ्यांनी तयार झालेली हळद कुरुंद्याच्या बाजारपेठत विक्रीस आणण्यास सुरवात केली आहे. उत्पादन खर्च पाहता मिळत असलेल्या भावाबद्दल शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. हळदीचे भाव जर असेच राहिले तर खत, फवारणी, मशागत खर्च यात निघेल की नाही, याची खात्री देता येणार नसल्याचे मत शेतकरी बांधवांतून व्यक्त होताना दिसत आहे. तर दुसरीकडे हळदीचा एकरी उतारा काही बरा आल्याचे शेतकरी सांगत आहेत. परंतु, कुरुंद्याच्या बाजारपेठेत हळदीला समाधानकारक भाव नसल्याचे नाराजी व्यक्त होत आहे.

उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात झाला
हळद उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात झाला असून सध्या बाजारपेठत हळदीला मिळत असलेला भाव जर असाच राहिला तर उत्पादन खर्च निघेल की नाही याची चिंता लागली आहे. या लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना होऊ नये, अशी अपेक्षा आहे. - गजानन बारसे, शेतकरी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025 : बिहारमध्ये मोठी घडामोड! स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता 'या' पक्षाने अचानक निवडणुकीतूनच घेतली माघार

Uttar Pradesh : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत केले दीपोत्सवाचे उद्घाटन, राम मंदिराच्या भूमिकेवरून विरोधकांवर साधला निशाणा

R Ashwin: 'भारतीय क्रिकेटमध्ये सर्वकाही अप्रत्यक्षपणे घडतंय...' शमी-आगरकर वादानंतर अश्विनला नेमकं काय म्हणायचंय?

Crime News : दोन मुलांच्या आईचा तरुणावर जडला जीव, नकार मिळताच उचललं धक्कादायक पाऊल, नेमकं काय घडलं? वाचा...

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये खाजगी बसचा अपघात, ८ जण जखमी

SCROLL FOR NEXT