Gram Panchayat Election Results Rajesh Tope 
मराठवाडा

आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी राखला गड; पाथरवाला, कुरण ग्रामपंचायतींवर बहुमत

सकाळ वृत्तसेवा

शहागड (जि.जालना) : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आला गड राखत पाथरवाला बु व कुरण ग्रामपंचायतीवर बहुमताने अंकुशराव टोपे ग्रामविकास पॅनल विजयी झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची सोमवारी (ता.१८) मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे गावगड्या कारभारी कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच बड्या राजकीय नेत्यांच्या गावाची सत्तेच्या पारड्याकडे ही अनेकांचे डोळे लागले आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील पाथरवाला बु व कुरण ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते.

कारण पाथरवाला हे गाव राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आहे. राष्ट्रवादीकडून अंकुशराव टोपे ग्रामविकास पॅनल विरुद्ध शिवसेनेचे पॅनल उभा होते. यात अंकुशराव टोपे ग्रामविकास पॅनलचे सहा उमेदवार बिनविरोध, तर सात उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. तर  सेनेचे दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष भास्कर मगरे यांनी  दोन वॉर्डामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या दोन ही वॉर्डात त्यांचा पराभव झाला आहे. दरम्यान गावगड्याच्या या निवडणुकीत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ग्रामपंचायत राखत आपला गड कायम राखला आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Short Circuit During EV Charging: फोर व्हिलर चार्जिंगला लावून झोपी गेले... नंतर EV मध्ये लागली आग, कुटुंबातील ८ जण जीवंत जळाले!

Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Hockey World Cup चे बिगूल वाजले! भारत-पाकिस्तान संघात पुन्हा आमने-सामने; १६ संघांचे ग्रुप्स जाहीर

Pune Crime : पुणे हादरले ! उच्चभ्रू सोसायटीत अल्पवयीन गतिमंद मुलीवर तीन नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT