jalna jalna
मराठवाडा

मंठ्यात गटविकास अधिकाऱ्यांना मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

दुपारी बारा वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयात घडली आहे

सकाळ वृत्तसेवा

ही घटना गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयात घडली आहे

मंठा (जालना): येथील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस यांना बिलाचे पैसै मला परत करा म्हणत चौघांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी संशयित उद्धव रामभाऊ पवार आणि इतर तीन जण अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी ( ता. पाच ) दुपारी बारा वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयात घडली आहे.

पंचायत समिती कार्यालयात गुरुवारी दुपारी गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस दैनंदिन कामकाज करीत होते. तेव्हा कार्यालयात संशयित उद्धव रामभाऊ पवार (रा.तळणी) आले. त्यांनी श्री.धस यांना ‘माझे पैसे मला परत करा’ असे म्हटले. त्यावर गट विकास अधिकारी धस यांनी आपल्याकडे तुझे कोणतेही पैसे नाहीत, असे सांगितले. त्यामुळे संतापलेल्या उद्धव पवार यांनी श्री.धस यांना जातिवाचक शिवीगाळ केली, त्यानंतर खुर्चीवरून खाली ओढून चापटा व बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच इतर तीन जणांना दालनामध्ये बोलावून घेतले. त्यांनी देखील चापटा - बुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी आणि मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर दोघांनी श्री.धस यांचे हात पकडून ठेवले, तर एकाने खुर्ची उचलून मारली, असे श्री.धस यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केलेले आहे. याबाबत जातिवाचक शिवीगाळ करणे, शासकीय कामकाजात अडथळा आणणे आणि चोरी या कारणावरून उद्धव रामभाऊ पवार आणि इतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी परतूर यांच्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यात दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी केली परीक्षेसाठी नोंदणी

Satara News: हजारोंच्या उपस्थितीत साताऱ्यात शिवजागर; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते महाआरती, डोळे दिपवणारी फटाक्यांची आतषबाजी!

NDA सरकारला झटका! 28 आमदारांचे सदस्यत्व होऊ शकते रद्द, पटना हायकोर्टाची नोटीस

आजचे राशिभविष्य - 20 फेब्रुवारी 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT