download 
मराठवाडा

पालकमंत्र्यांचे आश्वासन मिळाले अन् आंदोलन मागे

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसांपासून विविध मागण्यांसंदर्भात सुरू केलेल्या आंदोलनकर्त्या प्राध्यापकांची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी (ता.२६) भेट घेतली. या वेळी त्‍यांना तुमचे काम झाले असून ते वित्तविभागाकडे गेले असल्याचे आश्वासन दिल्यानंतर प्राध्यापकांनी हे धरणे आंदोलन मागे घेतले.

येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर विनाअनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन सुरू केले आहे. यात शंभर टक्‍के अनुदान हे प्रचलित नियमानुसार मिळावे, तसेच शंभर टक्के निकालाची अट रद्द करावी, यासाठी हे प्राध्यापक गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील महाविद्यालये बंद ठेवून संपात सहभागी झाले. जिल्ह्यातील ४६ कॉलेज बंद ठेवून या आंदोलनात तीनशे प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला.

तुमचे काम शिक्षण विभागाकडून झाले
शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी धरणे आंदोलनाला भेट दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांना सांगितले, तुमचे काम शिक्षण विभागाकडून झाले आहे आणि आता फाईलही वित्त विभागाकडे गेली. या आश्वासनावर प्राध्यापकांनी हे धरणे आंदोलन तात्पुरते मागे घेतले. पण जोपर्यंत आर्थिक तरतूद होत नाही, तोपर्यंत बारावी बोर्ड प्रात्यक्षिक परीक्षा व महाविद्यालय कामकाजावर बहिष्कार मात्र कायम राहणार असल्याचे कृती संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील प्राध्यापकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

ग्रामसेवक संवर्गाला हवाय वेळेवर पगार 
हिंगोली ः ग्रामसेवक संवर्गाच्या दरमहा होणाऱ्या मासिक पगारी वेळेवर होत नसल्याने ग्रामसेवकांतून नाराजी व्यक्‍त केली जात असून या पगारी वेळेवर द्याव्यात, अशी मागणी महाराष्‍ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २७) मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवदनाद्वारे केली आहे. या बाबत संघटनेचे जिल्‍हाध्यक्ष दिलीप पांढरे, सरचिटणीस राजेश किलचे, उपाध्यक्ष मंचक भोसले आदींनी निवेदन दिले आहे. 

राज्य ग्रामसेवक युनियनचे निवेदन
जिल्‍हा परिषदेच्या इतर विभागांच्या पगारी वेळेवर होतात. परंतु, जिल्‍हा परिषदेंतर्गत येणाऱ्या ग्रामसेवकांच्या पगारीबाबत अन्याय होत असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. पगार वेळेवर होत नसल्याने आर्थिक बाबीत हेळसांड होत आहे. त्‍यामुळे प्रत्‍येक महिण्न्याच्या एक किंवा दोन तारखेला पगारी द्याव्यात, अन्यथा मासिक व पाक्षिक बैठकीवर बहिष्कार टाकला जाईल, अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. महाराष्‍ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेच्या बैठे पथकात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या सेवा अधिग्रहीत करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana Record: स्मृती मानधनाचा रेकॉर्ड; विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यानंतर T20I मध्ये पराक्रम करणारी तिसरी भारतीय

Stock Market Today : भारतीय शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; परदेशी गुंतवणूकदारांची वापसी; सोन्याच्या भावाचा प्रभाव

Kashmir Saffron Crisis: साळिंदरांचा केशर उत्पादनाला फटका; काश्‍मीरमध्ये शेतकऱ्यांपुढे हवामान बदलासह आणखी संकट

BJP Minister Statement : ''राजकीय गरज म्हणून जाहीर केल्या अनेक योजना; आता पूर्ण करणं कठीण'', भाजप मंत्र्याची कबुली; राजकीय वर्तुळात खळबळ!

Satej Patil : 'दोरी तुटली, आता बांध ही स्वतंत्र झाले'; हसन मुश्रीफ यांच्या 'त्या' वक्तव्यावर काय म्हणाले सतेज पाटील?

SCROLL FOR NEXT