bordikar 
मराठवाडा

गुरू आयुष्याला मूर्त आकार देण्याचे काम करतात, कोण म्हणाले ते वाचा...

जगदीश जोगदंड

पूर्णा : आयुष्य आई-वडील प्रदान करतात; परंतु खऱ्याअर्थाने शाळा- महाविद्यालयांतीत गुरू हे आयुष्याला मूर्त आकार देण्याचे काम करत असतात, असे मत आमदार मेघना बोर्डीकर यांनी शिक्षक दिनानिमित्त बोलताना व्यक्त केले. 

माझे शालेय शिक्षण बालविद्या मंदिर परभणी येथील शाळेत दहावीपर्यंत झाले. हे शिक्षण घेताना लाभलेल्या सर्वच गुरुजनांचे योग्य मार्गदर्शन लाभले, जसे वेळेच महत्त्व, शिस्त व अभ्यासाचा पाया पक्का होणे या गोष्टींचा आयुष्यभर फायदा होतोच आहे. आज विधानसभेत प्रश्न विचारताना असो की प्रसारमाध्यमांना सामोरे जाताना असो, गृहपाठ पक्का असावा लागतो, याची जाणीव होते. माझ्या गुरुजींनी संस्कार दिले पण त्याचबरोबर विनयशीलता शिकवली, विषय कोणताही असो त्यातील बारकावे टिपण्याचे व वैशिष्ट्य जाणून घेण्याची बाब ही शालेय गुरुजनांचीच देण आहे. 

शाळेतील गुरुजनांनी घडविल्याचा अभिमान 
संतसाहित्य शिकताना विचारांच्या कक्षा रुंदावत गेल्या, तर इतिहास शिकताना ध्यैर्याने आलेल्या आव्हानांना सामोरे जायचे शिकायला मिळाले. त्यामुळे धाडसी वृत्ती निर्माण झाली. आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणारे हे गुरुजनच असतात याची जाणीव आज होत आहे. संस्कार व संस्कृती याचे धडे देण्यात शाळेतील देव मॅडम, श्री. उंडाळकर सर यांचा मोलाचा वाटा. माझे संवेदनशील मन शाळा व शाळेतील गुरुजनांनी घडवले याचा आज अभिमान वाटतो. सर्वधर्म समभाव, बंधुभाव व प्रखर राष्ट्रभक्ती या संस्काराचे बीज माझ्या हृदयात शाळेनेच पेरले. 

स्वतःमध्ये चांगले बदल घडवण्याचा प्रयत्न करते 
महाविद्यालयीन जीवनात प्रा. सुनील मोडक यांनी केवळ वनस्पतिशास्त्र शिकवले नाही, तर विषयापुरते मर्यादित न राहता त्यांनी आमच्यात आत्मविश्वास व जिद्द निर्माण केली, तसे पाहता आयुष्यातील प्रत्येक पावलावर जे चांगले लोक भेटतात व चांगले मार्गदर्शन करतात. त्या सर्वांकडून मी शिकत राहाते. स्वतःमध्ये चांगले बदल घडवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असते. ते लहान असो की मोठे सर्वच मला गुरुस्थानी आहेत. पण शाळा, महाविद्यालयीन गुरूचे स्थान आयुष्यात सर्वोच्च असते ते जीवन जगायला व आयुष्य घडवायला शिकवतात. 

कौटुंबिक तीन गुरू 
माझ्या राजकीय आयुष्यातील बाबा हे माझे सर्वोच्च राजकीय गुरू आहेत. सार्वजनिक आयुष्य कसे जगावे व ते समाजाप्रती कसे अर्पण करावे हे मी माझे पती यांच्याकडून शिकले. समाजातील गोरगरीब व गरजवंतांची माता होण्याचे बाळकडू मला माझ्या आईने दिले.  
- मेघना बोर्डीकर, आमदार. 

संपादन ः राजन मंगरुळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT