file photo 
मराठवाडा

Video : परभणीला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा

कैलास चव्हाण

परभणी : कोरोनाचा धुमाकुळ, उष्णतेची लाट अवकाळी पाऊस अशा तिहेरी संकटाचा सामना करण्याची वेळ जिल्हावासीयांवर आली आहे. परभणी जिल्ह्यात शनिवारी (ता. नऊ) मध्यरात्री वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे शेतआखाड्यांसह बागायती पिकांना मोठा फटका बसला आहे.

सर्वत्र कोरोनामुळे हाहाकार उडालेला आहे. संपूर्ण लॉकडाऊन झाल्याने अस्थिर वातावरण आहे. त्यात परभणी जिल्ह्यात उष्णतेची लाट सुरु झाली आहे. तापमान ४४ अंशावर जाऊन पोचले आहे. अशातच वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. मागील चार दिवसापासून उष्णतेसोबतच ढगाळ वातावरण देखील निर्माण होत आहे. रात्री जोराने वारे वाहत आहेत. शनिवारी दिवसभर उष्णतेची लाट कायम होती. तापमान देखील ४३ अंशावर होते. सायंकाळी प्रचंड उकाडा सुरु झाल्याने पावसाची चाहुल लागली होती. रात्री १२ च्या सुमारास जोरदार वारे वाहण्यास सुरवात झाली. अचानक विजांचा कडकडाट देखील सुरु झाला. काही वेळात पावसाच्या सरी कोसळल्या. परभणी शहरात हलक्या सरींनी हजेरी लावली. ग्रामीण भागात झरी, टाकळी, कुंभकर्ण, पोखर्णी आदी शिवारात जोरदार वारे होते. 

जिल्ह्यातील अनेक गावाना जबर फटका

टाकळी बोबडे, साडेगाव, संबर, सावंगी, दुधगाव शिवारात वादळी वारे असल्याने शेतआखाड्यांचे मोठे नुकसान झाले. वाऱ्यासोबतच गारांचा पाऊस झाला. सुमारे अर्धा तास पाऊस सुरु होता. जिंतुर तालुक्यातील बोरी परिसरात देखील वादळी वाऱ्याने हजेरी लावली. तब्बल अर्धा तास गारांचा पाऊस झाला. आडगाव, भोगाव शिवारात वारे होते. पूर्णा तालुक्यात गौर, सुहागन, बरबडी, सोन्ना, चुडावा भागात जोरदार वारे वाहत होते. याच परिसरात जोरदार पाऊस झाला. गंगाखेड तालुक्यात देखील जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. माखणी शिवारात तिन मिलीमिटर झाला आहे. पालम तालुक्यात देखील बनवस शिवारात देखील मध्यरात्रीला जोरदार वाऱ्यासह तिन मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

अनेक ठिकाणी झाडे मोडुन पडली 

शेतआखाड्यांचे मोठे नुकसान शनिवारी मध्यरात्री वादळी वाऱ्याची गती अधिक असल्याने तखाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर्णा, जिंतुर, परभणी या तिन तालुक्यात वादळी वारे होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आखाड्यावरील पत्रे उडुन गेली. नुकत्याच लावलेल्या कडब्याच्या गंजी देखील विखुरल्या गेल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी झाडे मोडुन पडली आहेत. तसेच कुकुटपालनातील 
कोंबड्यादेखील जखमी झाल्या आहेत. रात्रीच्यावेळी गारांचा पडला खच परभणी तालुक्यातील टाकळी बोबडे, साडेगाव, जोडपरळी  तसेच जिंतुर तालुक्यातील बोरी शिवारात मध्यरात्री पडलेल्या गारा पहाटे 
सुर्यप्रकाश पडे पर्यंत होत्या. अनेक तास गारा राहील्याने त्यांचा आकार किती मोठा होता हे लक्षात येत आहे.


केळी, टरबुजांचे झाले नुकसान
शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके घेतली आहेत. काहींनी टरबूज, खरबूज, काकडीची लागवड केली आहे. परंतु, शनिवारी झालेल्या गारांमुळे टरबूज पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच भाजीपाला, फळबागा यांनादेखील फटका बसला आहे. टाकळी येथील दिनेश बोबडे यांची केळी पिकाची बाग अडवी 
झाली आहे. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Interim PM Sushila Karki : नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांचे भारतातील ‘या’ प्रसिद्ध तीर्थक्षेत्राशी आहे खास नाते!

Latest Marathi News Updates : खरीप हंगाम पूर्ण वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात

Nitin Gadkari : ४०००० कोटींचे उत्पन्न... ७० लाख नोकऱ्या, गडकरींनी दिलेला कमाईचा मंत्र काय आहे?

Viral: वजन कमी करा आणि पैसे मिळवा... प्रसिद्ध कंपनीची अनोखी ऑफर, १८ किलो वजन कमी करणाऱ्याला २,४६,८४५ रुपये दिले

Marriage Registration Issue : सहा महिन्यांपासून विवाह नोंदणी पोर्टल ठप्प; हजारो विवाहांची नोंदणी रखडली

SCROLL FOR NEXT