Hairdresser to Tehsil Offic osmanabad sakal
मराठवाडा

उस्मानाबाद : केशकर्तनालय ते तहसील कार्यालय!

लोहगावचे मल्हारी चौधरी झाले प्रतिकूल परिस्थितीत तहसीलदार

सयाजी शेळके

उस्मानाबाद : त्याच्या घराची परिस्थिती बेताचीच. त्यामुळेच तो पारंपरिक पद्धतीने उस्मानाबाद शहरातील एका केशकर्तनालयात काम करीत होता. पण, त्याने केशकर्तनालयात काम करूनही जिद्दीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. आज तो तहसीलदार झाला. ही यशोगाथा आहे ती जिल्‍ह्यातील लोहगाव (ता. तुळजापूर) येथील मल्हारी चौधरी यांची. ते सोमवारी (ता. ३१) औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदारपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

लोहगाव (ता. तुळजापूर) येथील चौधरी कुटुंबीयांना तीन भावंडे आहेत. त्यातील एक जण नळदुर्ग येथील महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत तर दुसरे भाऊ पुणे येथे केस कर्तनालयात काम करतात. तर मल्हारी यांना पहिल्यापासून अभ्यासाची आवड होती. गावाकडे कोरडवाहू शेती असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नव्हता. भावाच्या मदतीने त्यांनी पुणे येथे जाऊन त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांची गोडी वाढत गेली. वर्ष २०१८ मध्ये त्यांना तहसीलदार पदाच्या यादीत स्थान मिळाले. अखेर त्यांची तोंडी मुलाखत २०१९ मध्ये झाली अन् तहसीलदार पदावर शिक्कामोर्तब झाले.

परिस्थिती हलाखीची असल्याने पदभार केव्हा मिळतो अन् केव्हा पगार सुरू होतो, याकडे त्यांचे डोळे लागले होते. पण, तहसीलदारपदी निवड झाली तरी अडचणी काही पाठ सोडत नव्हत्या. एक ना अनेक अडचणी त्यांच्या समोर वाढत गेल्या. व्यवसाय केल्याशिवाय दैनंदिन रोजीरोटीचा प्रश्न मिटत नव्हता. त्यामुळे त्यांनी शहरातील एका केस कर्तनालयात आपला व्यवसाय सुरू ठेवला. पुन्हा २०२० मध्ये कोरोनाने शिरकाव केला अन् त्यांना काही काळ थांबावे लागले. लॉकडाउनमुळे व्यवसायही बंद झाला. त्यामुळे संकट अधिकच वाढत गेले. अशाही परिस्थितीत ते डगमगले नाहीत. घरोघरी जाऊन त्यांनी व्यवसाय सुरू ठेवत उदरनिर्वाह केला. त्यांच्या या व्यवसायांमध्ये नम्रता तेवढीच होती.

औरंगाबाद जाण्यासाठीही नव्हते पैसे

आर्थिक अडचणी अनेकांच्या वाट्याला येतात. तशाच अडचणी चौधरी यांच्या वाट्याला आल्या. विशेष म्हणजे पदभार घेण्यासाठी औरंगाबादला जावे लागणार होते. पण, त्यांना तिथे जाण्यासाठी वाहन भाड्याचेही पैसेही त्यांच्याकडे नव्हते. मित्रांच्या मदतीने त्यांनी पैशाची जुळवणूक करून औरंगाबाद गाठले.

प्रत्येकाच्या समोर अडचणी नेहमीच असतात. पण, पर्याय सर्वच ठिकाणी असतो. तो कसा वापरायचा याची जाणीव प्रत्येकाला असायला पाहिजे. तरच अशा संकटावर मात करता येते. तरुणांनी संकटाला न घाबरता धैर्याने तोंड दिले पाहिजे. परिस्थितीशी जुळवून घेत, प्रसंगी दोन हात करीत संकटाला सामोरे जाणे शिकले पाहिजे.

- मल्हारी चौधरी, तहसीलदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT