Hingoli  sakal
मराठवाडा

Hingoli : गणेशवाडीतील अतिक्रमणांवर हातोडा

योजनेमध्ये पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे

सकाळ वृत्तसेवा

योजनेमध्ये पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे

हिंगोली : शहरातील गणेशवाडी भागात रस्त्याच्या कामात अडथळा असलेल्या अतिक्रमणांवर पालिका प्रशासनाच्या पथकाने शनिवारी हातोडा मारला. जेसीबीच्या मदतीने अतिक्रमणे जमीनदोस्त केली जात आहेत. येत्या काही दिवसांतच रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

हिंगोली पालिकेला नागरी भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करणे, या योजनेमध्ये पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून गणेशवाडीभागात हनुमान मंदिरापासून रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. १२ मिटर अंतराच्या या रस्त्याचे पालिकेकडून मोजमापही घेण्यात आले होते.

यामध्ये अनेक नागरिकांनी रस्त्यावरच अतिक्रमण करून पक्की बांधकामे केल्याचे आढळून आले होते. यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी अतिक्रमण धारकांना एक महिन्यापूर्वी अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटीस दिल्या होत्या. मात्र, अतिक्रमणधारकांनी मुदतीमध्ये अतिक्रमण काढले नाही.

त्यामुळे शनिवारी मुख्याधिकारी श्री. मुंडे, नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या पथकाने गणेशवाडी भागात पाहणी केली. त्यानंतर तातडीने जेसीबी व पोलिस पथक बोलावून अतिक्रमण हटविण्यास सुरवात केली. या अतिक्रमणामध्ये पाच पक्की बांधकामे असून, चार टीनपत्र्यांचे शेड आहेत. तसेच इतर कच्ची बांधकामे आहेत. या सर्व अतिक्रमणांवर पालिकेने हातोडा चालविला आहे.

पुढील काही दिवसांतच या ठिकाणी अतिक्रमण काढल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरवात केली जाणार आहे. या रस्त्यामुळे गणेशवाडी भागातील नागरिकांचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Mega Block : मुंबईप्रमाणे पुण्यातही मेगाब्लॉक! अमरावती-पुणेसह जवळपास ११ गाड्या रद्द, तर 'या' गाड्यांचे मार्ग बदलले

Maharashtra Weather Update : हिवाळ्याचा मूड बदलतोय! राज्यात किमान तापमानात चढ-उतार, ढगाळ वातावरण; गारठा कमी होणार

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड-सोलापूर दौऱ्यावर

Kolhapur Crime News : ‘तुला बाळ होत नाही’ पती, सासू, दीर, जाऊ सगळ्यांनी छळलं; शेवटी विवाहितेनं जे केलं ते धक्कादायक, कोल्हापुरातील घटना

अग्रलेख - जो दुसऱ्यावरी विसंबला...

SCROLL FOR NEXT