photo 
मराठवाडा

शाळेच्या विकासासाठी सरसावले ग्रामस्थांचे हात

राजेश दारव्हेकर

हिंगोली: तालुक्‍यातील काळकोंडी येथील जिल्‍हा परिषद शाळेचा विकास करण्यासाठी ग्रामस्थ सरसावले असून प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या बैठकीत २७ हजार रुपयांची देणगी जमा झाली आहे. त्‍यातुन शाळेत विविध विकासकामे केली जाणार आहेत.

काळकोंडी येथील लोकसंख्या एक हजार असून पहिली ते पाचवीपर्यंत जिल्‍हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत दोनशे विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेत यापूर्वी स्‍वतंत्र कार्यालय नव्हते. त्‍यानंतर अनुदानावर येथे कार्यालयाची उभारणी करण्यात आली. मात्र, विद्यार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी लोकसहभागातून सुविधा देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यानुसार प्रजासत्ताकदिनी ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. या वेळी ग्रामस्थांना शाळेतील सुविधांची माहिती देण्यात आली. तसेच लोकसहभागातून विकास कामे करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
हेही वाचा Republic Day 2020- पारदर्शक कर्जमुक्तीमुळे शेतकरी चिंतामुक्त- वर्षा गायकवाड


देणगीसाठी सरसावले हात

त्यानुसार शाळेचे मुख्याध्यापक टी. एम. पोघे यांनी स्‍वतः सात हजार रुपयांची देगणी दिली. तसेच शिक्षक एस. एम. गोरे यांनी शाळेस आठ हजार रुपयाची देणगी दिली. ग्रामसेवक दीपक कोकरे यांनी शाळेला एलईडी टीव्ही खरेदीसाठी दहा हजार रुपयाची देगणी दिली आहे. मुख्याध्याकाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून त्र्यंबकराव धबडगे, सावित्रीबाई फुले बचत गट व संतोष सोनवणे यांनी मिळून दोन हजारांची देणगी शाळेच्या सुविधेसाठी दिली आहे. अनेक ग्रामस्‍थांनी देखील मुख्याध्यापक श्री. पोघे यांच्या आवाहानाला प्रतिसाद देत देगण्या जाहीर केल्या आहेत.

यावरही क्लिक करा- कोरड्या बंधाऱ्याकडे पाहण्याची आली वेळ ​

विविध विकासकामांना प्राधान्य

या देगणीतून शाळेतील विविध विकास कामे केली जाणार आहेत. शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजीत विविध क्रीडा स्‍पर्धा, सांस्‍कृतिक कार्यक्रमातील विजेत्यांना पारितोषिकांचे वाटप करण्यात आले. या विजेत्यांच्या पारितोषिकांचा खर्च सुधाकर खडूळे, बालाजी खडूळे, मनिष खडूळे, शुभम मुंदडा यांनी उचलला आहे. शिवाय शाळेला छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली. याशिवाय शाळेतील शिक्षकांची दोन पदे रिक्त असल्यामुळे मदनराव लोथे पाटील यांच्या पुढाकाराने गावातील शेख सलमा या पदवीधर मुलीस अध्यापनाचे कार्य देवून तिच्या मानधनाचा खर्च गावकरी उचलणार आहेत. या वेळी शेख सलमा यांचा सत्कार करण्यात आला.

ग्रामस्‍थांनी पुढाकार घेतला


शाळेतील विकास कामांसाठी ग्रामस्‍थांना देणगीचे आवाहन केले. त्‍यासाठी स्‍वतः देगणी दिली. माझ्या सहकारी शिक्षकांनी देखील देगणी जमा केल्यानंतर ग्रामस्‍थांनी पुढाकार घेतला. यातून शाळेचा विकास केला जाणार असून विद्यार्थ्यांना सुविधा दिल्या जाणार आहेत.
-टी. एम. पोघे, मुख्याध्यापक

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT