प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र 
मराठवाडा

चोरलेले दागिने विकायला गेला पण...

सकाळ वृत्तसेवा

लातूर ः चोरी केलेले सोन्याचे दागिने विकण्यासाठी एक अट्टल गुन्हेगार गंजगोलाई भागात आला. खबऱ्यांमार्फत ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना समजली अन्‌ पुढच्या काही मिनिटांतच सापळा रचून पोलिसांनी त्या गुन्हेगाराला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केल्यानंतर त्याने लातूर जिल्ह्यातील निलंगा आणि देवणी भागात घरफोडी केल्याचे कबुल केले. त्याच्या खिशातील रोख 62 हजार रुपये आणि 5 हजार रुपयांचे मंगळसूत्र पोलिसांनी जप्त केले.

लातूर शहरात आणि जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत घरफोड्यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. काही भागांत तर घरफोड्यांचे सत्रच सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा घटनांमुळे पोलिसांचीही झोप उडाली आहे.

अनेक ठिकाणी घरफोडी

 बबन धोंडिराम बुधवाडे (रा. बाभळगाव, ता. लातूर) हा रेकॉर्डवरील आरोपी शनिवारी (ता. 7) पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याने मागील महिन्यात निलंगा तालूक्यातील होसूर गावात आणि देवणी येथील शिवकृपानगरमध्ये घरफोडी केल्याचे कबुलही केले आहे.बुधवाडे याला इंद्रप्रस्थ लॉज जवळून ताब्यात घेण्यात आले.

विविध ठिकाणी केल्या घरफोड्या

त्याच्याकडील मिळालेल्या एकुण रकमेपैकी 37 हजार रूपये होसूर येथे केलेल्या घरफोडीतील तर उर्वरित 25 हजार रूपये आणि दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हे देवणी येथे केलेल्या घरफोडीतील असल्याचे बुधवाडे याने सांगितले. त्यानूसार पोलिसांनी औराद शहाजनी आणि देवणी येथील पोलिस स्टेशनमधील गुन्हे अभिलेखाची पाहणी केली. तेव्हा 14 नोव्हेबर रोजी होसूर येथे तर 3 नोव्हेंबर रोजी देवणी येथे घरफोडीच्या घटना घडल्याची नोंद आढळून आली.  त्यानंतर बुधवाडे याच्याकडील रोख रक्कम आणि मंगळसूत्र असा एकुण 67 हजार रूपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

ही कामगिरी पोलिस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने, अपर पोलिस अधिक्षक हिम्मत जाधव यांच्या सूचनेप्रमाणे पोलिस निरिक्षक सुनील नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनील रेजितवाड, अंगद कोतवाड, संपत फड, राम गवारे, युसूफ शेख, राजाभाऊ म्हस्के यांनी केली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पाऊसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT