उजनी (ता. औसा, जि.लातूर) : पावसामुळे तेरणा नदीने रौद्र रूप धारण केल्याने येथील बाजारपेठेत पाणी शिरले आहे. Terna River, Latur
मराठवाडा

Latur Rain : लातूरच्या उजनीत पावसाचे तांडव, पाणी शिरले गावात

केतन ढवण

उजनी (जि.लातूर) : उजनी (ता.औसा) (Ausa) परिसरात पुन्हा एकदा पावसाने थैमान घातले असुन सोमवारी (ता.२७) रात्रभर पावसाचे तांडव पाहिला मिळाले. यामुळे तेरणा नदीने (Terna River) रुद्र रूप धारण केले असून नदीचे पाणी येथील बाजार चौकात मंगळवारी (ता.२८) शिरले आहे. पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असल्याने येथील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. येथील काही व्यवसायांना (Rain In Latur) या पाण्याने विळखा घातला होता. दुसरीकडे शेती व पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे सोयाबीन, उडीद, मूग आदीं पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. उजनीसह एकंबी, एकंबीवाडी, एकंबी तांडा, अशीव, कमालपुर, चिंचोली काजळे, मासूर्डी, टाका, बिरवली, शिवली आदी गावांना या पावसाचा फटका बसला आहे.

अगोदरच बाजारपेठेत सोयाबीन पिकाचे दर कोसळत असताना आता पावसामुळे पिके पूर्णतः गेल्याने शेतकरीही पुरता कोसळून गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या पिकांवर संपूर्ण आर्थिक गणित अवलंबून होते. शेतकऱ्याने जी स्वप्ने पाहिली होती ती सर्व पावसाच्या पाण्यात गेल्याचे चित्र आहे. मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरासोबत शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखील आसवांचा पूर आल्याचे पाहायला मिळाले. हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी पूर्णतः हताश झाले आहेत. शासनाने तरी सदरील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT