सकाळ
मराठवाडा

हिंगोली : चौथ्या दिवशीही 'मुसळधार'

जनजीवन विस्कळीत कापूस पिकाचे नुकसान शेतकरी चिंतेत

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : हिंगोली शहर व परिसरासह सेनगाव तालुक्यातील काही गावात गुरुवारी (ता. २३) सलग चौथ्या दिवशीही सकाळी नऊ वाजल्यापासून साडे अकरापर्यंत रिमझिम पाऊस सुरू झाला असुन ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सलग होत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात सोमवार, मंगळवारी, बुधवार असा सलग तीन दिवस पाऊस झाला.

आज सकाळी हिंगोली शहर व परिसरातील बासंबा, सिरसम, भांडेगाव, साटंबा, पारोळा, फाळेगाव, पिंपरखेड, कारवाडी, कोथळज, सवड, पांगरी, खांबाळा, सावरखेडा, खानापूर आदी गावासह सेनगाव तालुक्यातील गोरेगाव व परिसरातील गावात सकाळी नऊ वाजता पावसाची रिमझिम सुरू झाली ती साडेअकरा पर्यंत कायम होती.

त्यानंतर पावसाने उघडीप दिली मात्र ढगाळ वातावरण कायम होते. सकाळी काही वेळ ऊन देखील पडले होते. मात्र नंतर ढगाळ वातावरण व पावसाची रिमझिम सुरू झाली. तर यावेळी कळमनुरी, वसमत, सेनगाव व औढा शहरात ढगाळ वातावरण होते. सलग चार दिवसापासून हिंगोली शहरासह परिसरात होत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

शहरातील अनेक वसाहतीत जाणारे रस्ते चिखलमय झाले आहेत. तर शहरातील सखल भागात पावसाचे पाणी जमा झाले आहे. सलग होणाऱ्या या पावसाने बाजारात शुकशुकाट आहे. दरम्यान, या पावसाने सोयाबीन काढणीस व्यत्यय आला आहे. तालुक्यातील भांडेगाव शिवारात काढणी केलेल्या सोयाबीन पिकात पावसाचे पाणी जमा झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात होत असलेल्या पावसाने कापूस पिकांचे देखील नुकसान झाले असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT