covid 19
covid 19 covid 19
मराठवाडा

जालन्यात पावसाची जोरदार हजेरी, पेरणीच्या कामाला वेग

सकाळ वृत्तसेवा

भोकरदन (जालना): सलग दुसऱ्या दिवशी भोकरदन (bhokaradan) शहरासह परिसरात सोमवारी (ता.सात) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली (jalna rain updates). सायंकाळपर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती. आता मंगळवारपासून (ता.आठ) सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश होणार आहे. त्यातच पाऊस हजेरी लावत असल्याने शेतशिवारात खरीप पिकांची लागवड, पेरणीच्या कामाला वेग येणार आहे.

भोकरदन शहर व तालुक्यातील काही भागात रविवारी (ता.सहा) पावसाने दमदार हजेरी लावली. त्यात तालुक्यातील अन्वा महसूल मंडळात जोरदार पाऊस झाल्याने या भागातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या पावसामुळे खरीप पेरणीच्या कामांना वेग येणार असून, धुळपेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी देखील भोकरदन शहरासह परिसरात पावसाला सुरुवात झाली. साधारण अर्धा तासाच्यावर जोरदार पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळपर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती. सलग दोन दिवसांच्या पावसाने मुख्य रस्त्यावरील खड्ड्यात वाढ झाली आहे. जाफराबादकडे जाणाऱ्या रस्त्याच्या नूतनीकरणाचे व पुलाचे काम सुरू आहे, या कामांमुळे पावसाचे पाणी परिसरातील दुकानांत शिरल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. तसेच सखल भागात ही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे दिसून आले.

रोहिलागड परिसरात रोहिण्या बरसल्या-

अंबड तालुक्यातील रोहिलागड सह नांदी,धनगर पिंपळगाव,किनगाववाडी,किनगाव परिसरात सोमवारी (ता.सात) रोहिण्या बरसल्या. परिसरात सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास व रात्री सातच्या सुमारास झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. तसेच लागवड केलेल्या कपाशी,मका पिकांना देखील आधार मिळाला आहे.

विजेच्या कडकडाटासह अंबडला पाऊस
अंबड, ता.७(बातमीदार) : शहरासह परिसरात सोमवारी(ता.सात)दुपारी अडीच वाजेच्या नंतर आकाशात चांगलेच ढग दाटून आले. विजेच्या कडकडाट व ढगाच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दमदार पडलेल्या पावसामुळे शेतात पाण्याचे पाट पसरले. शहराबरोबर मार्डी, शिरनेर, पारनेर, डावरगाव, लालवाडी, पावसेपांगरी, कासारवाडा, बनटाकळी आदी ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकरी पावसामुळे सुखावला आहे. खरीप पेरणीची लगबग सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Latest Marathi News Live Update: मध्य रेल्वेच्या ३० समर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ

SCROLL FOR NEXT