Osamanabad Rain 
मराठवाडा

उस्मानाबाद जिल्ह्यात इथे झाली अतिवृष्टी तर भीजपावसाने.....

राजेंद्रकुमार जाधव

उस्मानाबाद: जिल्ह्याच्या बहुतांश भागांत सोमवारी (ता.एक) रात्रीपासून मंगळवारच्या (ता.दोन) पहाटेपर्यंत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. मंगळवारी सकाळी आठपर्यंत संपलेल्या गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १२.३८ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. जून महिन्याची सुरवात होताच मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याच्या बहुतांश भागांत हजेरी लावली. गेल्या तीन चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने उष्णतेत वाढ झाली होती. ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही भागांत मान्सूनपूर्व पाऊसही झाला.

गेल्या महिनाभरापासून कडाक्याचे ऊन असतानाही शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी शेतीच्या मशागतीची कामे सुरू केली होती. बहुतांश शेतकऱ्यांची ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा दमदार पावसाची आहे. यंदा लॉकडाऊनमुळे कृषी विभागाने खत व बियाण्यांच्या वाटपाचे नियोजन केले असून, शेतकरी गटांमार्फत थेट बांधावर खत पोचविण्याची कामे वेगाने सुरू आहेत.

बियाणे खरेदीसाठी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. सोमवारी दुपारपासूनच जिल्ह्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण होऊन रिमझिम पाऊस झाला. उस्मानाबाद शहरात रात्री साडेदहाच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. २५ मिनिटे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मंगळवारी पहाटेच्या सुमारासही पाऊस झाला. जिल्ह्यातील ४२ पैकी ३८ महसूल मंडळात कमी- अधिक प्रमाणात पाऊस झाला.

तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. या मंडळात सर्वाधिक ६७ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. तेर (ता. उस्मानाबाद) महसूल मंडळात ४८ मिलीमीटर, तुळजापूर महसूल मंडळात ३९ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. उस्मानाबाद तालुक्यातील सर्व आठ महसूल मंडळात पावसाने हजेरी लावली. तुळजापूर तालुक्यातील सर्व सात, उमरगा तालुक्यातील पाचपैकी चार, लोहारा तालुक्यातील सर्व तीन, कळंब तालुक्यातील सर्व सहा, भूम तालुक्यातील पाचपैकी तीन, वाशी तालुक्यातील सर्व तीन, परंडा तालुक्यातील पाचपैकी चार महसूल मंडळात पावसाने हजेरी लावली.

बहुतांश महसूल मंडळात भीज पाऊस झाला आहे. माकणी (ता. लोहारा) येथे मंगळवारी पहाटे एकच्या सुमारास वीस मिनिटे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. येडशी (ता. उस्मानाबाद) येथे रात्रभर भीज पाऊस सुरू होता. तुरोरी (ता. उमरगा) परिसरात मध्यरात्रीपासून पहाटे पाचपर्यंत भीजपाऊस झाला. केसरजवळगा (ता. उमरगा) परिसरात पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान तासभर मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

इटकळ (ता. तुळजापूर) परिसरात पहाटे तीन ते चार या वेळेत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तेर (ता. उस्मानाबाद) येथे सोमवारी रात्री नऊ ते दहा दरम्यान तासभर मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तेर महसूल मंडळात ४८ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. पाथरुड (ता. भूम) परिसरात पहाटे एकपासून पाचपर्यंत भीजपाऊस झाला. वाशी येथे सोमवारी रात्री नऊपासून तासभर पावसाने हजेरी लावली. मुरुम (ता. उमरगा) परिसरात पहाटे दोनच्या सुमारास वीस मिनिटे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT