RAIN 
मराठवाडा

हिंगोलीत आज पहाटेपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस

सकाऴ वृत्तसेवा

या पावसामुळे सध्या हिंगोली तालुक्यातील अनेक गावात सुरू असलेल्या हळद काढणीस व्यत्यय आल्याने कामे खोळबंली आहेत.

हिंगोली : हिंगोली शहरासह तालुक्यातील अनेक गावात तसेच सेनगाव (Sengaon) तालुक्यातील काही गावात रविवारी (ता. नऊ) भल्यापहाटे साडेचारपासुन मेघगर्जनेसह जोरदार पाऊस (Rain) सुरू झाला. या पावसामुळे हळद काढणीची कामे खोळंबली आहेत तर आंबा व भाजीपाला पिकांचे नुकसान (Damage to vegetable crops) झाले आहे. सकाळी सुर्यदर्शन देखील झाले नाही पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. (Heavy rains started in Hingoli on Sunday morning)

जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून मेघगर्जनेसह पाऊस सुरू आहे. मध्यतंरी दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर रविवारी हिंगोली शहरासह तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे, पिंपरी, फाळेगाव, कनेरगाव, नर्सी, बळसोंड, बासंबा, खांबाळा, पळशी, पांगरी, कारवाडी आदी गावात सकाळी साडेचार ते पाच यावेळी जोरदार पाऊस झाला. त्यानंत दोन तासाच्या विश्रांतीनंतर परत साडेसात ते नऊ वाजेपर्यंत पाऊस सुरुच होता. तसेच सेनगाव तालुक्यातील केंद्रा बुद्रुक व परिसरातील गावात देखील पाऊस झाला.

या पावसामुळे सध्या हिंगोली तालुक्यातील अनेक गावात सुरू असलेल्या हळद काढणीस व्यत्यय आल्याने कामे खोळबंली आहेत. शेतात वाळत असलेली व काढुन ठेवलेली हळद झाकण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी धावपळ करावी लागली. तर या पावसामुळे हातात आलेल्या आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर टमाटे, मिरची, काकडी, कोथिंबीर, पालक आदी भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याचे शेतकरी सा़गत आहेत.

या पावसामुळे सकाळ पासून सुर्यदर्शन झाले नाही. जोरदार पाऊस सुरू होता. जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे हळद काढणी खोळबंली आहे. सकाळी साडेचार वाजता सुरू झालेला पाऊस नऊ वाजेपर्यंत कायम होता. मेघगर्जना देखील सुरू होती. या पावसाने हिंगोली शहर व परिसरात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. वातावरण गारवा निर्माण झाला आहे. पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने दिवसभर पाछस सुरू राहणार असल्याचे वातावरण तयार झाले आहे.

(Heavy rains started in Hingoli on Sunday morning)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जहाजांची वाहतूक सुरु होण्याचा मार्ग मोकळा; इराणने दिली माहिती, सामंजस्य कराराचा मसुदा तयार

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी 'क्रिकेट देवा'चे खास ट्विट... क्रिकेट दिग्गजांकडूनही कौतुक! RR चा धावांचा डोंगर

Latest Marathi News Live Update : राजकारणापासून ते गुन्हेगारीपर्यंत देशात आज काय-काय घडलं? एका क्लिकवर जाणून घ्या प्रत्येक अपडेट

Mumbai-Goa Highway : झाडं लावली की फक्त कागदावरच दाखवली? मुंबई-गोवा महामार्गावरील 'त्या' 1 लाख 96 हजार वृक्षांचं नक्की काय झालं? प्रशासनाचा नवा प्लॅन काय?

Crime: भयंकर! ४८७ हून अधिक पुरुषांसोबत शरीरसंबंधासाठी दबाव, सिगारेटचे चटके, मारहाण अन्... प्रियकराचं प्रेयसीसोबत पाशवी कृत्य

SCROLL FOR NEXT