lohagve.jpg 
मराठवाडा

येथे बंदोबस्तातील कर्मचाऱ्यांना पाजवला जातो चहा

सुरेश घाळे


धर्माबाद, (जि. नांदेड) : सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी सुरू आहे. या काळात कोरोना लढ्यासाठी येथील डाॅक्टर, नर्स, पोलिस प्रशासन हे मानवतेचे पुजारी आपला जीव धोक्यात घालून कोरोना लढ्यात देवदूत बनून आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य रात्रंदिवस पार पाडतांना दिसत आहेत. कर्तव्यावर असताना चहा पाण्याची गैरसोय होऊ नये, या हेतूने भाजपचे जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांनी शुक्रवारी (ता. १७) धर्माबाद येथील आरोग्य विभाग व पोलिस प्रशासन यांना स्वखर्चातून चहा बनविण्याचे यंत्र व त्यासोबत लागणारे साहित्य किट देऊन स्वतः चाय बनवून आपल्या हाताने चहा पाजवून एक आगळा वेगळा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.


जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पूर्ण
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबई येथील मातोश्री निवासस्थान परिसरात असलेल्या चहाच्या दुकानदारास कोरोना झाल्यामुळे त्या चहावाल्याचा संपर्क मातोश्रीवर बंदोबस्तासाठी असलेल्या खासगी व पोलिस कर्मचाऱ्यांशी झाल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मातोश्रीवर असलेल्या खासगी व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ हटविण्यात आले आहे व त्या परिसराला कोरोना हाॅस्पाॅट म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना लढ्यासाठी आरोग्य विभाग व पोलिस प्रशासन रात्रंदिवस जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडतांना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व पोलिस कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असतांना दिवसरात्र वेळेवर चहा मिळावा व मातोश्री परिसरात असलेल्या चहाच्या दुकानदारांची पुनरावृत्ती होऊ नये, याची खबरदारी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांनी घेतली आहे.

कर्मचाऱ्यांचे अभिनंदन 
लोहगावे यांनी स्वखर्चातून धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालय, पोलिस स्टेशन, तेलंगणा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर बंदोबस्तासाठी असलेल्या दोन्ही राज्यांच्या पोलिस बांधवांना चहा बनविण्याचे यंत्र व सोबत लागणारे साहित्याचे किटचे वाटप शुक्रवारी केले आहे. हा आगळा वेगळा उपक्रम त्यांनी राबवून स्वतः चहा बनवून आपल्या हाताने आरोग्य विभाग व पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना चहा पाजवला. तसेच कोरोना लढ्यात आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन व पत्रकार बांधावांचा सिंहांचा वाटा असल्यामुळे वरील सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून लोहगावे यांनी आभार मानले आहे. 

यावेळी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पोतगंठीवार, संजय पाटील शेळगावकर, साईनाथ शिरपुरे, पत्रकार गोविंद नर्सीकर, सुभाष पेरकेवार, भाजपचे शहराध्यक्ष रामेश्वर गंदलवार, गिरीधर बुंदेले, योगेश डोईजड, बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष माधव हानमंते, बहुभाषिक पञकार संघाचे माजी अध्यक्ष कृष्णा तिम्मापुरे, सुरेश घाळे, सुमेध बनसोडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शेख एकबाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मीनारायण केशटवार, पोलिस निरीक्षक सोहन माछरे, पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सनगल्ले यांच्यासह आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनातील कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : नागपूर महापालिकेची आढावा बैठक आता नितीन गडकरींच्या घरी; विरोधक जाणार का?

RBI E-cheque: मोठी घोषणा! आता कागदी चेकऐवजी ई-चेकची एंट्री होणार; भारतीय रिझर्व्ह बँकेकडून प्रस्ताव सादर, बँकिंगमध्ये नवा अध्याय

Dream XI च्या गच्छतीनंतर BCCI ने आणली IPL Fantasy League, टीम निवडा, बक्षिसे जिंका, पण नियम काय?

Uttarakhand News : उत्तराखंडचा कायापालट! हरिद्वार-ऋषिकेशपर्यंत धावणार 'रॅपिड रेल'; मुख्यमंत्री धामींचा पंतप्रधान मोदींकडे कनेक्टिव्हिटी आणि संरक्षणाचा 'महाप्लॅन'

Latest Marathi News Live Update : लॉकडाउनची अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT