file photo 
मराठवाडा

हिंगोली : वधू पित्याकडून वधूस आंदण म्हणून दिली ३१ फळझाडांची भेट, तेलगावच्या राऊत परिवाराचा उपक्रम

राजेश दारव्हेकर

हिंगोली - वसमत तालुक्यातील तेलगावचे विठ्ठलराव राऊत यांची कन्या विद्याचा विवाह बुधवार ता.नऊ सकाळी घरगुती पद्धतीने खुजड्याचे त्र्यंबकराव कु-हे यांचे चिरंजीव गजानन यांच्याशी झाला. या लग्न समारंभात वधु पित्या कडून वधुस आंदण म्हणून ३१ फळझाडे भेट देण्यात आली. ज्यात  नारळ सहा,चिकु सहा, चिंच सहा ,सिताफळ सहा, जांभूळ सहा आणि तुळस अशी  फळझाडे दिली. 

वडील विठ्ठलराव व काका बालाजी राऊत यांनी पर्यावरण पूरक विवाह सोहळा पार पाडत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. लग्नात लाखो रूपयाची उधळन. लाखो रुपयाच्या वस्तू वरील खर्च टाळून कमीतकमी खर्चात विवाह सोहळा पार पाडता येतो. याचे उदाहरणच, या कुटुंबाने  समोर आणले आहे.

लग्नात लाखो रुपयाच्या वस्तू देऊन ज्या की चार पाच वर्षात निरउपयोगी होतात, खराब होतात. अश्या वस्तू टाळून पुढील पाच पिढ्यांना ज्या झाडाचा उपयोग होईल असे फळझाडे आंदण देण्यात आले. मागील दोन वर्षापासून एक मुल तीस झाडे अभियान ही संकल्पना विवाहसोहळ्यात राबवण्यासाठी प्रेरित करते. विवाह सोहळ्यात इतर खर्च वाचून पर्यावरण पूरक विवाह सोहळा संपन्न होईल. नवदांपत्याच्या पुढील पाच पिढ्यांना लग्नाची आठवण राहिल आणि फळझाडापासून उत्पन्न मिळून कुटुंब सुखी जीवन जगेल.

कोरोनाच्या काळात सर्वत्र बंद असतांना शेती सुरूच होती. माणूस कोणत्याही वस्तूंच्या उपभोगाशिवाय जगू शकतो परंतू अन्नाशिवाय जगू शकत नाही. अन्न धान्य चांगले पिकण्यासाठी निसर्गाचे संतुलन राखणे गरजेचे आहे. त्याच बरोबर हमीचे उत्पादन शेतक-याला मिळणेही गरजेचे आहे. फळझाडांच्या लागवाडीमुळे हे दोन्ही उद्दिष्ट पूर्ण होतात.म्हणून निदान शेतकरी बांधवांनी तरी आपल्या कुटुंबाच्या आणि शेतीच्या उपयोगी स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे. 

लग्न सोहळ्यात इतर वस्तू ज्या पद्धतीने भेट देतो. त्याऐवजी फक्त तीन हजार रुपयाची तीस फळझाडे दिली तर पुढील पाच पिढ्या सुखी होतील. कुटुंबातील व्यक्तीला फळे खायला तर मिळतील बरोबरच या झाडापासून उत्पन्नही मिळेल. हाच उद्देश डोळ्या समोर ठेवून वधुचे काका बालाजी राऊत, सखाराम चापके, आजोबा रामकिशन राऊत यांनी हे पाऊल उचलले आहे व शेतकरी बांधवांनीही पुढील संकटाचा सामना करण्या साठी हे पर्यावरण पूरक पाऊल उचलण्याची विनंती केली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT