file photo 
मराठवाडा

हिंगोली : जिल्ह्यात अतिवृष्टीने ३३ टक्के पिकांचे नुकसान- विजय लोखंडे

राजेश दारव्हेकर

हिंगोली :  जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे ३३ टक्यापेक्षा अधिक नुकसान झाले असून विकेल ते पिकेल यासह इतर कृषी योजनांच्या जिल्ह्यातील अमंलबजावणी बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी माहिती दिली. 

जिल्ह्यात माहे जून ते ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या नुकसानीचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले असून सहा हजार ११९ हेक्टर बाधीत क्षेत्र आहे. जिल्ह्यात सन २०२०-२१ खरीप हंगामामध्ये एकूण प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र चार लाख सहा हजार ७७४ हेक्टर इतके आहे. तसेच राष्ट्रीय बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, ग्रामीण बँकांनी मिळून ता.२६ सप्टेंबर अखेर खरीप कर्ज एकूण ४८५ कोटी ८०  लाख  वाटप केले असल्याचे श्री. लोखंडे यांनी सांगितले.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील एकूण २४०  गावाची निवड

यासह.महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ८६ हजार ६५३ शेतकऱ्यांना ५६५ कोटी ५८  लाठ रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील एकूण २४०  गावाची निवड करण्यात आली असून त्यांना १६ कोटी ९५ लाख एवढे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. 

एकात्मिक फलोत्पादन विकास इत्यादी योजनातून अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिल्या जाणार

विकेल ते पिकेल धोरणातंर्गत उपप्रकल्पांच्या अर्थसहाय्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, केंद्र पुरस्कृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्याची योजना, राज्य पुरस्कृत गट शेती योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास इत्यादी योजनातून अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.

एक लाख ४७  हजार ७२४ हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला आहे

पंतप्रधान पिक विमा योजना खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील तिन लाख ८८८ अर्ज आले असून त्यामधून एक लाख ४७  हजार ७२४ हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये समाज माध्यमांचा वापर करुन शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करण्यासाठी शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उप्तादक कंपनी व ग्राहक यांच्या व्हॉटस् ॲप ग्रुप तयार करुन भाजीपाला व फळांची थेट ग्राहकांना विक्री करण्यात आली.  यामध्ये एकूण ५७ गटांद्वारे व १३५ व्हॉट्स अप ग्रुपद्वारे सात हजार ६५३ क्विंटल  भाजीपाला व फळांची  विक्री करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय लोखंडे यांनी दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पंजाबमध्ये माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT