Hingoli Accident esakal
मराठवाडा

कारच्या भीषण अपघातात ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू,एक जण गंभीर जखमी

एक जण गंभीर जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विठ्ठल देशमुख

सेनगाव (जि.हिंगोली) : जिंतूर-फाळेगाव राज्य महामार्गावर कारचा भिषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी (ता.२६) रात्री दहाच्या सुमारास घडली. यामध्ये ३२ वर्षीय ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. जिंतूर - फाळेगाव या राज्य महामार्गाचे बांधकाम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. अत्यंत संथगतीने काम सुरू असून बऱ्याच ठिकाणी सतर्कतेचे फलक लावले नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास ग्रामसेवक नितीन शिंदे (वय ३२) हे वाहनाने सेनगावकडून (Sengaon) वाशीमकडे जात असताना आजेगावजवळ (Hingoli) कारचा अपघात झाला आणि यात नितीन शिंदे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

तर यामध्ये त्यांच्या सोबत असलेला एक जण गंभीर जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे दोघे देखील वाशिम जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. या राज्य महामार्गावर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी सेनगावजवळ एका पुलाखाली ६ जणांचा मृत्य झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. तर मकोडी फाट्यावर देखील एका दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अजूनही अपघाताच्या घटना घडतच असल्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या रस्त्याचे बांधकाम अत्यंत संथगतीने सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 नंतर मुंबई इंडियन्स रोहित शर्माला मुक्त करणार? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या...

उष्णतेत नागरिकांना मोठा फटका! मुंबईत ६ प्रभागांमध्ये ३० तास पाणीपुरवठा बंद; कोणत्या आणि कधी? वाचा यादी...

IPL 2026: "काका, काळजी नको, पुढच्या वेळी हेल्मेट देऊ!" प्रिती झिंटाने जखमी चाहत्याची चौकशी करताना केली थट्टा; Video Viral

Paithan Pachod News: आधुनिक वॉटर प्युरिफायरला मागे टाकत पाचोडच्या आठवडे बाजारात ‘गरिबांचा फ्रिज’ मातीच्या माठांना उसळीची मागणी

Latest Marathi News Live Update : अलिबाग–वडखळ मार्गावर मोठी वाहतूक कोंडी; पर्यटक तासन्‌तास अडकले

SCROLL FOR NEXT