corona 
मराठवाडा

हिंगोलीत दोघांचे अहवाल निगेटिव्ह तर दोघांचे प्रलंबित 

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः जिल्‍हा सामान्य रुग्णालयात ‘कोरोना’ संशयितांसाठी तयार केलेल्या आयसोलेशन वार्डात सोमवारपर्यंत (ता.सहा) पाच कोरोना संशयित रुग्ण भरती आहेत. यापैकी दोघांचा अहवाल निगेटिव्ह तर दोघांचा अहवाल प्रलंबित आहे. तर यापैकी एकाचा अहवाल या अगोदरच पॉझीटिव्ह आल्याची माहिती डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.

पाच संशयितांपैकी पहिला रुग्ण (वय ४९) ज्याचा अहवाल गुरूवारी (ता.दोन) औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पॉझीटिव्ह आला आहे. त्‍याची प्रकृती स्‍थिर आहे. दुसरा कोरोना संशयित (वय ४०) हा कोवीड रुग्णाच्या निकटतम सहवासामधील व्यक्‍ती आहे. त्‍याची प्रकृती स्‍थिर आहे. या व्यक्‍तीचा अहवाल निगेटीव्ह आहे. तसेच तिसरा संशयित (वय ४७) हा संशयित कोरोना संसर्ग असलेल्या शहरातून आला असून त्‍याला फ्‍ल्यु सारखी लक्षणे आहेत. त्याचा अहवाल निगेटिव्ह आहे. चौथा व्यक्‍ती (वय ३८) हा संशयित कोरोना संसर्ग असलेल्या शहरातून आला असून त्‍याला फ्ल्यू सारखी लक्षणे आहेत. त्‍याची प्रकृती स्‍थिर आहे. याचा अहवाल प्रलंबित आहे.

अकरा व्यक्‍तींचा होम क्‍वॉरंटाइनचा कालावधी संपला 
पाचवा व्यक्‍ती (वय २९) कोवीड रुग्णांच्या निकटतम सहवासातील व्यक्‍ती आहे. त्‍याची प्रकृती स्‍थिर आहे. याचा अहवाल प्रलंबित आहे. दरम्‍यान, जिल्‍ह्यात परदेशातून आलेल्या व घरातच अलगीकरण करण्यात आलेल्या सर्व ११ व्यक्‍तींचा १४ दिवस होम क्‍वॉरंटाइनचा कालावधी संपला आहे. येथील आयसोलेशन वार्डात भरती केलेल्या रुग्णांची संख्या २० आहे. पॉझीटीव्ह आलेला एक रुग्ण तर निगेटिव्ह रुग्णांची संख्या १७ आहे. आयसोलेशन वार्डात भरती असलेल्या व रिपोर्च प्रलंबित असलेल्या रुग्णांची संख्या दोन असल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.

सतरा रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह
येथील आयसोलेशन वार्डात भरती करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या २० आहे. कोवीड पॉझीटिव्ह आलेला एक रुग्ण आहे तर निगेटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या १७ असून आयसोलेशन वार्डातून डिस्चार्ज केलेल्या एकूण रुग्णांची संख्या १७ आहे. शासकीय क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या एकूण व्यक्‍तीची संख्या नऊ आहे. तर आयसोलेशन वार्डातून भरती असलेल्या व रिपोर्ट प्रलंबित असलेल्या रुग्णांची संख्या दोन असल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT