सेनगावजवळ अपघात , चार शिक्षक ठार 
मराठवाडा

हिंगोली ब्रेकींग : खड्ड्यात कार कोसळून चार शिक्षक ठार; सेनगांवजवळ अपघात

लोणार तालुक्यातील अंकूश गायकवाड, त्र्यंबक थोरवे रा. पळसखेड, जि. बुलढाणा, विजय ठाकरे, गजानन सानप रा. खळेगांव ता. लोणार, अशी या मृतांची नावे आहेत.

विठ्ठल देशमुख

सेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : सेनगावजवळ राज्य रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी करण्यात आलेल्या खड्ड्यात कार कोसळून पडल्याने पाण्यात बुडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १३) रात्री आकरा वाजताच्या सुमारास घडली आहे. हे चौघे शिक्षक असल्याची समोर आली आहे.

लोणार तालुक्यातील अंकूश गायकवाड, त्र्यंबक थोरवे रा. पळसखेड, जि. बुलढाणा, विजय ठाकरे, गजानन सानप रा. खळेगांव ता. लोणार, अशी या मृतांची नावे आहेत. चौघेही शिक्षक असून शाळा सुरु होणार असल्यामुळे ते आपल्या मुलांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी नांदेड येथून आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - ज्यो बायडेन आणि व्लादिमीर पुतिन यांची 16 जून रोजी भेट होणार आहे

सेनगाव ते जिंतुर राज्य महामार्गाचे काम सुरु आहे. सेनगाव जवळच पुलाचे बांधकाम सुरु आहे. या कामासाठी मोठा खड्डे तयार केले आहेत. याच खड्ड्यात रविवारी रात्री स्विफ्ट कार (एम एच २८ ऐ झेड ११२०) कार पडली. खड्ड्यातील पाण्यामध्ये कार उलटी झाली. ही कार पूर्णपणे लॉक असल्यामुळे. कारमधील कोणालाही बाहेर निघता आले नाही. अन त्यातच गुदमरुन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान या ठिकाणी वाहनाचा मोठा आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी जाऊन पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. यानंतर सेनगावच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक दीक्षा लोकडे, उपनिरीक्षक अभयकुमार माकने, हवालदार अनिल भारती, श्री. शिदे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन गावकऱ्यांच्या मदतीने वाहनातील चारही मृतदेह बाहेर काढले. सदर मृतदेह सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. या मध्ये दोन मृतदेहाच्या खिशात आधार कार्ड मिळाल्यामुळे हे चौघे लोणार तालुक्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन त्यांच्या लोणार येथील कुटुंबियांशी संपर्क साधला.

येथे क्लिक करा - सोशल मिडियावर सध्या हा चर्चेचा विषय असून ही अंडी 10 व्या शतकातील असल्याचा दावा केला जातोय.

दरम्यान, जिंतुर ते फाळेगांव या राज्य महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. या कामाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकाराचे फलक लावण्यात आले नसल्यामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज लागत नाही. यामुळे या ठिकाणी अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मात्र संबंधित गुत्तेदाराकडून निष्क्रियता दिसून येत आहे. त्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप परिसरातील नागरीकांतून केला जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT