file photo 
मराठवाडा

हिंगोलीच्या उद्योजकाची पुण्याच्या दाम्पत्यानी केली तीन कोटी ३५ लाखाची फसवणूक 

राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोलीच्या उद्योजकाकडून पोल्ट्री फिडसाठी लागणारी एक हजार २३३ मेट्रीक टन ढेप खरेदी करून पैसे न देता तीन कोटी ३५ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे येथील साकार पोल्ट्री प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या संचालक दाम्पत्याविरुध्द हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी (ता.सात) रोजी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील औद्योगिक वसाहतीमध्ये ज्ञानेश्‍वर मामडे यांच्या मालकिची शिवा पार्वती पोल्ट्री फिड प्रायव्हेट लिमीटेड नावाची कंपनी आहे. या ठिकाणी सोयाबीनपासून पोल्ट्री फिडसाठी ढेप तयार केली जाते. सदरील ढेप राज्यभरातील विविध कंपन्यांना मागणीनुसार पुरवली जाते. त्यानुसार पुणे येथील साकार पोल्ट्री प्रा. लिमिटेड साकोरे नगर सोसायटी, लोहगाव, पुणे या कंपनीने ढेपेचा पुरवठा करण्याची मागणी शिवा पार्वती कंपनीकडे नोंदवली होती.

२०११ पासून त्यांचा व्यवहार सुरु झाला

त्यानुसार २०११ पासून त्यांचा व्यवहार सुरु झाला. मात्र, (ता.२९) मार्च २०१७ ते (ता.१४) जुलै २०१७ या कालावधीत साकार कंपनीला त्यांच्या मागणीनुसार ६७ ट्रकमध्ये एक हजार २३३ मेट्रीक टन ढेप पाठवली. या ढेपेची किंमत तीन कोटी ३५ लाख एवढी आहे. त्यांच्या मागणीनुसार ढेप पुरवठा केल्यानंतर संबंधित कंपनीचे संचालक मंगेश धुमाळ व शितल मंगेश धुमाळ यांनी पैसे देण्यास टाळाटाळ चालवली होती. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर मामडे यांनी वेळोवेळी पुणे येथे कंपनीच्या कार्यालयात जाऊन मंगेश धुमाळ यांना पुरवठा करत पैसे देण्याची मागणी केली. मात्र त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली.

तीन कोटी ३५ लाख १७ हजार ९०९ रुपयांची फसवणूक

त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मामडे यांनी बुधवारी (ता.सात) हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये साकार कंपनीच्या संचालकांनी तीन कोटी ३५ लाख १७ हजार ९०९ रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमुद केले. यावरून पोलिसांनी साकार पोल्ट्री कंपनीचे संचालक मंगेश धुमाळ व शितळ धुमाळ यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, सदर प्रकरण आर्थिक बाबीशी संबंधित असल्याने प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. पोलिस निरक्षक एस. एस. दळवे तपास करीत आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT