file photo
file photo 
मराठवाडा

हिंगोली : येलदरी धरणाच्या डाव्या कालव्यासाठी नागरिक व लोकप्रतिनिधि करणाऱ आंदोलन

राजेश दारव्हेकर

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील मुळ गांव असलेल्या येलदरी येथे मारोती मंदिरात बुधवार (ता. २६)  गांवकऱ्यांच्या उपस्थितित नारळ फोडण्यात आले आहे. लवकर येलदरी धरणातून डावा कालवा काढावा या बाबत आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी यावेळी सांगितले.

येलदरी धरणातुन डावा कालवा काढण्यात यावा यासाठी संपूर्ण तालुक्यातुन मागणी होऊ लागल्याने तालुक्यातील बहुतांश नागरिक आता आंदोलनाच्या तयारित आहेत. सोशलच्या माध्यमातून बऱ्याच पोस्ट फिरल्यानंतर शिवसेनेने सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. येणाऱ्या काळात सर्व लोकप्रतिनिधि एकत्र येऊन लढा देतील अशी आशा तालुक्यातील सुज्ञ नागरिकांतुन व्यक्त केली जात आहे. 

शेकडो हेक्टर कोरडवाहू जमीनी पाण्याखाली येऊन जनतेचे कल्याण होईल

तर शिवसेनेने मात्र असंख्य कार्यकर्त्यांसह तालुक्यातील येलदरी गावात जाऊन नागरिकांची भेट घेतली व या मागणी संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला यावेळी गावातील मारोती मंदिरात नारळ फोडण्यात आले व पुढील आंदोलनाची दिशा लवकरच ठरवण्यात येईल असे सांगण्यात आले. या धरणातुन आपल्या तालुक्यामध्ये कालवा काढण्यात आला तर शेकडो हेक्टर कोरडवाहू जमीनी पाण्याखाली येऊन जनतेचे कल्याण होईल असा आशावाद शिवसेनेने व्यक्त केला आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य नारायनबाबा राठोड, प्रवीण महाजन, माजी पंचायत समिती सदस्य गणेश राठोड व गावकरी बांधव उपस्थित होते.

यावर्षी येलदरी धरण शंभर टक्के भरल्याने

दरम्यान, येलदरी धरणातून डावा कालवा झाल्यास त्याचा सेनगाव तालुक्यासह हिंगोली तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. या बाबत मागच्या अनेक दिवसांपासून शेतकरी करीत आहेत. यावर्षी येलदरी धरण शंभर टक्के भरल्याने धरणातून नदी पात्रात सोडण्यात आले होते. यामुळे या धरणातून  डावा कालवा काढल्यास त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार असल्याने या माणनीने जोर धरला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT